इलेक्ट्रॉनिक रंगसंकेत

इलेक्ट्रॉनिक रंगसंकेत ही १९२० साली अमेरिकेतील रेडिओ उत्‍पादक संघाने(RMA) शोधलेली पद्धत इलेक्ट्रॉनिक घटकांवर त्याचे "मोजमाप"(values or ratings) दर्शवण्यासाठी वापरली जाते. आकाराने लहान रोधके, धारित्रेविद्युतप्रवर्तकावर त्यांचे मोजमाप छापणे कटकटीचे, छापले तर वाचायला कठीण व शिवाय खर्चिक असल्यामुळे ही पद्धत योजण्यात येते. या पद्धतीत रोधके, धारित्रे, विद्युतप्रवर्तकावर त्यांचे मोजमाप प्रत्यक्ष न छापता काही रंगांच्या साह्याने दर्शविले जाते.


उदा.
चित्र १
चित्र १ पहा, त्यात ४ रंगाचे पट्टे असलेला रोधक (4-Band Resistor) दर्शविला आहे. बारकाईने निरीक्षण केल्यास दिसेल, की एका टोकाजवळील पट्टा हा इतर तीन पट्ट्यांच्या तुलनेत अधिक जास्त अंतरावर आहे. हा जास्त अंतरावरील पट्टा म्हणजेच टॉलरन्स बॅन्ड होय, हा सर्वात शेवटचा पट्टा असतो. हा पट्टा इतर तीन पट्ट्यांनी दर्शवलेल्या मोजमापात प्रत्यक्ष किती टक्के तफावत असू शकेल याचा अंदाज सांगतो. त्याच्या अगदी विरुद्ध टोकाकडील पट्टा हा पहिला, त्याच्या लगतचा दुसरा आणि त्यानंतर मल्टिप्लायर(गुणक) बॅन्ड हा तिसरा पट्टा असतो.


BBROYGBVGW ही अक्षरे क्रमाने लक्षात ठेवली की पट्टे पाहून त्या लहान आकाराच्या इलेक्ट्रॉनिक किंवा विजेच्या साधनाचे मोजमाप चटकन ध्यानात येते.


रंग पहिला पट्टा दुसरा पट्टा तिसरा पट्टा चौथा पट्टा
काळा
-
तपकिरी
±१%
लाल
००
±२%
तांबडा
०००
पिवळा
००००
हिरवा
०००००
±०.५%
निळा
००००००
±०.२५%
जांभळा
०००००००
±०.१%
राखाडी
००००००००
±०.०५%
पांढरा
०००००००००
सोनेरी
×०.१
±५%
चंदेरी
×०.०१
±१०%
कोणताच नाही
±२०%