रेणीगुंटा

आंध्र प्रदेशातील जनगणना शहर, भारत

रेणीगुंठा हे आंध्र प्रदेश राज्याच्या चित्तूर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव तिरुपतीपासून जवळ असून येथील रेल्वे स्थानक मुंबई-चेन्नई, चेन्नई-बंगळूर आणि चेन्नई-हावरा रेल्वेमार्गांवरील प्रमुख जोडस्थानक आहे. तिरुपती विमानतळ येथून जवळ आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,०३१ होती.