रेड बुल अरेना (जर्मन: Red Bull Arena) हे जर्मनी देशाच्या लाइपझिश शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. भूतपूर्व पूर्व जर्मनी देशामधील हे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम होते. इ.स. २०१० पर्यंत हे स्टेडियम झेंट्रालस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. रेड बुल ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव रेड बुल अरेना असे ठेवण्यात आले.

रेड बुल अरेना
मागील नावे झेंट्रालस्टेडियोन (१९५६ - २०१०)
स्थान लाइपझिश, जाक्सन जर्मनी
उद्घाटन ४ ऑगस्ट १९५६
पुनर्बांधणी २००० – २००४
आसन क्षमता ४४,३४५

२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने संपादन

२००६ फिफा विश्वचषक संपादन

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
११ जून २००६   सर्बिया आणि माँटेनिग्रो 0–1   नेदरलँड्स गट क 37,216
१४ जून २००६   स्पेन 4–0   युक्रेन गट ग 43,000
१८ जून २००६   फ्रान्स 1–1   दक्षिण कोरिया गट ग 43,000
२१ जून २००६   इराण 1–1   अँगोला गट ड 38,000
२४ जून २००६   आर्जेन्टिना 2–1 (AET)   मेक्सिको १६ संघांची फेरी 43,000


बाह्य दुवे संपादन