रूर
(रुहर या पानावरून पुनर्निर्देशित)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
रुहर (जर्मन: Ruhr) हा जर्मनी देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबीट)असे म्हणतात. हा परिसर नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन (NRW) या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची लोकसंख्या ५० ते ६० लाखाच्या आसपास आहे.
शहरेसंपादन करा
. खालील शहरे रुहर परिसरात मोडतात.
प्रसिद्ध उद्योगसंपादन करा
जर्मनीतील तसेच युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा प्रदेश जर्मनीतील सर्वाधिक औद्योगिकरण झालेला भाग आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने अनेक खाणी व प्रसिद्ध उद्योग या भागात आहेत. जर्मनीतील औद्योगिक क्रांती याच भागात सुरू झाली.
- बायर केमिकल्स व फर्टिलायझर्स
- उधे इंजिनिअरिंग
- क्रुप इंडस्ट्रीज