रियो ग्रांदे
(रियो ग्राँड नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
रियो ग्रांदे (इंग्लिश: व स्पॅनिश: Rio Grande) ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावते. तेथून आग्नेयेकडे ३,०५१ किमी लांब वाहत जाउन ती मेक्सिकोचे आखात ह्या अटलांटिक महासागराच्या उपसमुद्राला मिळते. अमेरिकेच्या कॉलोराडो, न्यू मेक्सिको व टेक्सास ह्या राज्यांमधून वाहणारी ही नदी अमेरिका व मेक्सिको राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा ठरवण्यासाठी वापरली गेली आहे. रियो ग्रांदेच्या उत्तरेस टेक्सास राज्य तर दक्षिणेस मेक्सिकोची चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओन व तामौलिपास ही चार राज्ये स्थित आहेत.
रियो ग्रांदे | |
---|---|
न्यू मेक्सिकोमधील रियो ग्रांदे | |
उगम |
रॉकी पर्वतरांग, कॉलोराडो 37°47′52″N 107°32′18″W / 37.79778°N 107.53833°W |
मुख |
मेक्सिकोचे आखात 25°57′22″N 97°8′43″W / 25.95611°N 97.14528°W |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
अमेरिका, मेक्सिको कॉलोराडो, न्यू मेक्सिको, टेक्सास, चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओन, तामौलिपास |
लांबी | ३,०५१ किमी (१,८९६ मैल) |
उगम स्थान उंची | ३,६५८ मी (१२,००१ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४,७१,९०० |
ह्या नदीचे पाणी शेती व मानवी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे केवळ २० टक्के पाणी समुद्रापर्यंत पोचते.
मोठी शहरे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |