राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था

राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था - ३० जुलै १९६३ रोजी नवी दिल्ली येथे भारत सरकार द्वारा सुरू करण्यात आली. ह्या संस्थेच्या स्थापने मागे भारतीय मलेरिया संस्थेचे विस्तारीकरण आणि पुनर्नियोजन करणे असे होते. नवीन संस्था स्थापन करण्या मागे रोग साथ विज्ञान आणि संक्रमणशील रोग प्रतिबंधन ह्या विषयात राष्ट्रीय शिक्षा आणि संशोधन केंद्र सुरूकारणे असा होता. ही संस्था गुरू गोविंदसिह इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली ह्याचेशी संलग्नीत आहे.

स्थान संपादन

राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्थेचे मुख्यालय हे श्यामनाथ मार्ग, नवी दिल्ली येथे आहे. संस्थेचा ८ शाखा भारतात खालील ठिकाणी आहेत.

  1. अलवर (राजस्थान)
  2. बेंगलुरू (कर्नाटक)
  3. कोझिकोडे (केरळ )
  4. कुनूर (तमिलनाडु)
  5. जगदलपुर (छत्तीसगढ़)
  6. पटना (बिहार)
  7. राजमुंदरी (आंध्रप्रदेश)
  8. वाराणसी (उत्तर प्रदेश).

विभाग संपादन

  1. एड्स आणि संबंधित रोग
  2. रोगपरिस्थितिविज्ञान आणि परजीविक रोग
  3. प्राणिसंक्रमित रोग
  4. सूक्ष्मजीवशास्त्र
  5. जीवरसायनशास्त्र आणि जीवतंत्रशास्त्र

बाह्य दुवे संपादन

राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था Archived 2012-03-01 at the Wayback Machine.