राष्ट्रीय कृषी बाजार

राष्ट्रीय कृषी बाजार अथवा 'राष्ट्रीय कृषी मंडी' तथा ई-नाम, ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक योजना आहे.२०१५ -१६ च्या अर्थसंकल्पात देशात राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली ,केंद्र सरकार ,नीती आयोग आणि राज्याशी सल्लामसलत करून एकीकृत राष्ट्रीय कृषी बाजार स्थापना करेल अशी ती घोषणा होती ,राष्ट्रीय कृषी बाजाराच्या आराखड्यास केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने १ जुलै २०१५ रोजी मंजूरी दिली . शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक तांत्रिक स्वरूपाची योजना आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने, शेतकऱ्यांना विक्रीसाठी एक समान मंच(कॉमन प्लॅटफॉर्म) मिळावा व त्यायोगे त्यांना योग्य भाव मिळावा म्हणून ५८५ ठोक (घाऊक )बाजारांना एकमेकांशी जोडण्यात आले आहे. ही योजना १४ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जन्मदिनाप्रित्यर्थ एक पथदर्शी स्वरूपात सुरू करण्यात आली.

आजतागायत, भारतातील १३ राज्यांच्या ४१९ बाजारांना ई-नाम द्वारे जोडण्यात आले आहे. याव्यतिरिक्त,१६ अधिक राज्यांच्या ५४२ बाजारांना ई-नाम पोर्टल सोबत जोडण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे.शेअर मार्केट प्रमाणेच यावर ऑनलाईन व्यवहार देखील करता येतात.

  १४ एप्रिल २०१६ला ई -नाम या नावाने राष्ट्रीय कृषी बाजाराचे पोर्टल हे इंग्रजी,हिंदी, गुजराती,मराठी, तेलगूबंगाली भाषेत सुरू करण्यात आले, या पोर्टलचा 'उत्तम फसलं ,उत्तम इनाम ' असा नारा आहे .

बाह्य दुवे

संपादन