रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटला
रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटला हा रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस या प्रतिमुद्रण (फोटोकॉपी) करणाऱ्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या आवारातील करारित प्राधिकृत दुकानाविरुद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, टेलर अँड फ्रांसिस या प्रकाशकांनी दिल्ली उच्चन्यायालयात चालवलेला प्रताधिकार खटला आहे.
रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस कागदपत्रांच्या प्रती पुरवण्या सोबतच प्राध्यापकांच्या निर्देशानुरूप विद्यार्थ्यांना अभ्याससंचिका (कोर्सपॅक) उपलब्ध करून देण्याची सेवा ठराविक दराने पुरवतात. या अभ्याससंचिका प्रकाशकांच्या प्रताधिकारीत पुस्तकांवर आधारित असल्यामुळे प्रकाशकांचे आर्थिक नुकसान होते हा वादी प्रकाशकांचा दावा आहे, तर सदर प्रतिमुद्रणांना प्रताधिकार कायद्याच्या उचित वापर नियमांनुसार (फेर डिल) मुभा असल्याचे प्रतिवादी रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस आणि इतर प्रतिवादींचे म्हणणे आहे.
खटल्याचे शीर्षक, सुनावणी आणि प्रगती
संपादनखटल्याचे शीर्षक The Chancellor Masters and Scholars of the University of Oxford v. Rameshwari Photocopy Services असे आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी दिल्ली उच्चन्यायालयाच्या एक न्यायाधीशीय पीठाने निकाल दिला होता त्या निकाला बाबत असमाधानी वादींनी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे (डिव्हिजन बेंच) त्यास आव्हान दिले. ९ डिसेंबर २०१६ रोजी दोन न्यायाधीशीय पीठाने सुधारीत निकाल देताना काही व्याख्यांचे स्पष्टीकरण केले तर काही निकाल पुर्नसुनावणीसाठी राखून ठेवला.
अभ्याससंचिकामधील प्रताधिकारीत मजकुराचा उपयोग शिक्षकांच्या इंस्ट्रक्शनसाठी अभिप्रेत गरजेच्या पलिकडे नाहीना हे तपासणे[१]; आणि प्रताधिकारीत पूर्ण पुस्तकाचे प्रतिमुद्रण प्रताधिकार कायद्यान्वये कितपत ग्राह्य आहे याची पुर्नसुनावणी घेतली जाईल[२]असे ९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालाने स्पष्ट केले.
निकाल दस्तएवजातील संदर्भ कायदे कलमे आणि इतर न्यायालयीन निकाल
संपादन- भारतीय प्रताधिकार कायद्याचे कलम ५२ उपकलम १चा खंड h आणि खंड i
Certain acts not to be infringement of copyright (1) The following acts shall not constitute an infringement of copyright, namely,- .....
(h) the publication in a collection, mainly composed of non-copyright matter, bona fide intended for instructional use, and so described in the title and in any advertisement issued by or on behalf of the publisher, of short passages from published literary or dramatic works, not themselves published for such use in which copyright subsists:
Provided that not more than two such passages from works by the same author are published by the same publisher during any period of five years.
Explanation.—In the case of a work of joint authorship, references in this clause to passages from works shall include references to passages from works by any one or more of the authors of those passages or by any one or more of those authors in collaboration with any other person;
(i) the reproduction of any work—
(i) by a teacher or a pupil in the course of instruction; or (ii) as part of the questions to be answered in an examination; or (iii) in answers to such questions;
- कलम ३ Publication शब्दाची व्याख्या
डिसेंबर २०१६ मध्ये दोन न्यायाधीशीय खंडपीठाने स्पष्ट केलेली भूमिका
संपादनखालील लेखन आणि अनुवाद अद्याप पूर्णपणे नेमके अथवा अद्ययावत असेल असे नाही.
- जोपर्यंत कायदेमंडळ (संसद) एखाद्या उचित वापरास सुस्पष्टपणे अग्राह्य ठरवत नाही, तो पर्यंत तो कायद्यात धरला पाहीजे.[३]
- आणि म्हणून भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ च्या कलम ५२ उपकलम १चा खंड (i) उचित वापर भारतीय निकषांवर आंतर्भाव असल्याचे मानले गेले पाहीजे, न की भारतेतर देशातील चार तत्त्वांच्या फेर यूज टेस्टने.
- in course of instruction मध्ये course of instructionची सुरुवात किमान शिक्षकासाठी शिक्षकाच्या तयारी पासून चालू होते ते विद्यार्थ्यासाथी नंतर पर्यंत असते.
- To put it differently, so much of the copyrighted work can be fairly used which is necessary to effectuate the purpose of the use i.e. make the learner understand what is intended to be understood.(दर्जा अथवा क्वांटीटीचा परिमाणाचा प्रभाव ५२ उपकलम १चा खंड (i) च्याबाबतीत असणार नाही.) [४]
- उचित वापर शैक्षणिक उपयोगाच्या उद्दीष्टांशी समानुपाती (proportionate: 'extent justified by the purpose' [५] ) असला पाहीजे (म्हणजे प्रमाणबाह्य (disproportionate) असू नये.
- खंडपीठाने भारतीय प्रताधिकार १९५७ मधील 'प्रकाशन' ('publication’) आणि पुर्ननिर्मिती (‘reproduction’) मधील अर्थांचा फरक स्पष्ट केला; प्रकाशन (publication) हे सार्वत्रिक असलेच पाहीजे असे नाही तर समुहातील विशीष्ट गटास उद्दीष्ट ठेवूनही असू शकते हे स्पष्ट केले; त्याचवेळी या कायद्यांतर्गत 'पुर्ननिर्मिती' (‘reproduction’) मध्ये नफ्याचा घटक असणार नाही तर, 'प्रकाशन' ('publication’) मध्ये नफा हा घटक महत्त्वाचा असेल असे प्रतिपादन केले.[६]
- 'पुर्ननिर्मिती' (‘reproduction’) मध्ये अनेकवचन अंतर्भूत आहे म्हणून अनेक प्रतिमुद्रणे ग्राह्य असतील.तसेच शिक्षक आणि विद्यार्थी ह्या शब्दातही अनेकवचनाचा अंतर्भाव ग्राह्य राहील [७]
- प्रतिमुद्रण (फोटोकॉपी) व्यावसायिकाचे मध्यस्थ असणे ग्राह्य ठरते[८]; विद्यार्थ्यांची खरेदीक्षमता नसल्यामुळे प्रकाशकांच्या व्यवसायाचे नुकसान होत नाही, तसेच प्रतिमुद्रण (फोटोकॉपी) व्यावसायिक फोटोकॉपीच्या नियमीत दरा पलिकडे दर घेत नाही म्हणून तो प्रकाशकांचा स्पर्धक ठरत नाही.[९]
बाह्य दुवे
संपादन- काही प्राध्यापकांची भूमिका
- इंग्लिश विकिस्रोतात भारतीय प्रताधिकार कायदा बेअर ॲक्ट
- 16 September 2016चा निकाल Archived 2017-02-15 at the Wayback Machine.
- December 9, 2016चा निकाल Archived 2017-01-27 at the Wayback Machine.
विश्लेषणे
संपादन- DELHI UNIVERSITY VS. PUBLISHERS; अनिकेत पांडे Archived 2017-02-02 at the Wayback Machine. (प्रकाशन तारीख अनुपलब्ध)
- The Appeal Bench’s decision Delhi university photocopying case: fair use re-visited
- CHANGING MOODS OF THE MOIRAI – A TWIST IN THE DU PHOTOCOPY CASE
- The DU Photocopying Case: Opening the Floodgates of Open Access in Indian Education
संदर्भ
संपादन- ^ (९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालातील मुद्दा क्रमांक ५६)
- ^ (९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालातील मुद्दा क्रमांक ७९)
- ^ (खंडपीठाच्या निकालातील मुद्दा क्रमांक ३१)
- ^ (खंडपीठाच्या निकालातील मुद्दा क्रमांक ३३ आणि ३५)
- ^ (खंडपीठाचा निकाल मुद्दा क्रमांक ३३)
- ^ (९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालातील मुद्दा क्रमांक ५७)
- ^ (खंडपीठाचा निकाल मुद्दा क्रमांक ३९)
- ^ (९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालातील मुद्दा क्रमांक ६०)
- ^ (९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालातील मुद्दा क्रमांक... आणि ६०)