स्वामी जगतगुरू श्री रामानंदाचार्य हे मध्ययुगीन भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांनी रामभक्तीची धारा समाजातील प्रत्येक वर्गातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. शास्त्रांच्या आधारे त्यांनी रामभक्तीची धारा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. कबीर सागरानुसार, त्यांचे आध्यात्मिक जीवन पाच वर्षांच्या लहानपणी कबीरांनी दिलेल्या ज्ञानाने प्रारंभ झाले. त्यानी आदिरामाची भक्ति सुरू केली. तसेच वैष्णव बैरागी संप्रदायाची स्थापना केली होती, ज्याला रामानंदी संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते.

गुरू रामानंद

मूळ नाव स्वामी रामानंदाचार्य
जन्म ३० डिसेंबर, ~ १३००-१३८० इ.स. [][]
प्रयागराज दिल्ली सल्तनत (सध्याचे उत्तर प्रदेश भारत)
निर्वाण अज्ञात तारीख, ~ १४००-१४७५ इ.स. []
बनारस दिल्ली सल्तनत (सध्याचे वाराणसी उत्तर प्रदेश, भारत)
धर्म सनातन धर्म
शिष्य २ कवयित्री-संत आणि १० कवी-संत ज्यात कबीर, रविदास, भगत पीपा, आणि सूरसुरानंद यांचा समावेश आहे
संप्रदाय रामानंदी संप्रदाय
वडील पुण्य सदन शर्मा
आई सुशीला देवी
विशेष माहिती बैरागी रामानंदी संप्रदाय चे संस्थापक,
मुख्य कवी-संतांचे गुरु,
उत्तर भारतातील भक्ती यात्रा चे अग्रदूत, समाजसुधारक
भारतीय टपाल तिकिटावर रामानंदाचार्य यांचे चित्र.

सुरुवातीचे जीवन

संपादन

स्वामी रामानंद यांचा जन्म प्रयागराज येथील एका कान्यकुब्ज ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला देवी आणि वडिलांचे नाव पुण्य सदन शर्मा होते. लहानपणापासूनच त्यांनी विविध प्रकारच्या अलौकिक ज्ञानाचा प्रचार करण्यास सुरुवात केला.[] [] धार्मिक विचार असलेल्या त्यांच्या पालकांनी त्यांना रामानंदला शिक्षणासाठी काशी येथील स्वामी राधवानंद यांच्याकडे श्रीमठात पाठवले. श्रीमठात राहून त्यांनी वेद, पुराण आणि इतर धर्मग्रंथ अभ्यासले आणि प्रख्यात विद्वान बनले. पंचगंगा घाट येथील श्रीमठात राहून त्यांनी १४०० ऋषि शिष्य ज्ञान प्रचारक म्हणून ठेवले होते. नंतर कबिरांसोबत ज्ञान चर्चा केल्यावर शास्त्रानुसार ज्ञान प्राप्त करून त्यांनी भक्ती साधना केली.[] त्यापैकी एक वैष्णव प्रचारक स्वामी अष्टानंद हे कबिरांच्या कमळाच्या फुलावर अवतरित होतानाच्या दृश्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते.

गुरुशिष्य परंपरा

संपादन

रामानंदी संप्रदायाचे संस्थापक स्वामी रामानंद यांनी रामभक्तीचे द्वार सर्वसामान्य माणसांसाठी उघडले. ते प्रारंभी शूद्र जातीशी भेदभाव करत असत, पण संत कबिरांकडून (ज्यावेळी जे फक्त पाच वर्षांचे होते) १०४ वर्षांच्या वयात दीक्षा घेतली आणि त्यांच्या मनातली ही भावना नष्ट झाली. कबिरांच्या चमत्कारांतून त्यांना धर्मातील समानतेचे ज्ञान झाले. त्यानंतर त्यांचे अनंतानंद, भावानंद, पीपा, सेन नाई, धन्ना, नाभा दास, नरहर्यानंद, सुखानंद, कबीर (गुरू परंपरा टिकविण्यासाठी)[], रविदास, सुरसरी, पदमावती असे चौदा शिष्य होते, ज्यांना चतुर्दश महाभागवत म्हणून ओळखले जाते. रामानंदी संप्रदाय सगुण उपासना करतो आणि विशिष्टाद्वैत सिद्धांत मानतो, कारण कबीरांनी दिलेले ज्ञान या संप्रदायमध्ये विस्मृत झाले आहे.[]

कबीर आणि त्यांचे शिष्य रविदास यांनी सतगुण निर्गुण रामाची उपासना केली. अशा प्रकारे, स्वामी रामानंद हे असे महान संत होते ज्यांच्या छायेत सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारचे संत-उपासक विश्राम करत असत. जेव्हा समाजात सर्वत्र द्वेष आणि वैमनस्य पसरले होते, त्यावेळी स्वामी रामानंदांनी कबिरांकडून ज्ञान समजून भक्ती करणाऱ्यांसाठी "जात-पात पूछे ना कोई-हरि को भजै सो हरि का होई" असा नारा दिला. त्यांनी सर्वे प्रपत्तेधिकारिणों मताः ह्या सिद्धांताचा प्रचार केला आणि भक्तीचा मार्ग सर्वसामान्य माणसांसाठी उघडला. []

रामानन्दी पंथ

संपादन
मुख्य लेख: रामानंद पंथ

स्वामी रामानंदांनी स्थापन केलेला रामानंदी पंथ किंवा रामवत पंथ हा आज वैष्णव तपस्वी/साधूंचा सर्वात मोठा धार्मिक गट आहे. वैष्णवांच्या ५२ दरवाजांपैकी ३६ दरवाजे फक्त रामानंदीय संन्यासी/वैरागींचे आहेत. हे सर्व द्वार ब्राह्मण कुळातील शिष्यांनी स्थापन केले होते, त्यापैकी एक पिपासेन हे क्षत्रिय होते. या पंथात भक्ताने ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक नाही.[]

भक्ति-यात्रा

संपादन

स्वामी रामानंद हे वैष्णव उपासक होते. ते काशीमध्ये चारही वेदांचे ज्ञाता म्हणून प्रसिद्ध होते. परंतु स्वामींना शास्त्रसंगत साधना कबीरजींकडूनच प्राप्त झाली.[१०] स्वामींनी १४०० ऋषी शिष्य प्रचारक म्हणून तयार केले होते.[११] स्वामींच्या त्या शिष्यांपेकीच एक होते स्वामी विवेकानंद,जे अतिशय उत्तम कथावाचक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना काशी नगरातील एका क्षेत्राचे उद्येशक म्हणून देखील नियुक्त केले गेले होते. दररोज प्रमाणेच, जेव्हा स्वामी विवेकानंद विष्णु पुराणातून कथा सांगत होते, तेव्हा ते श्री हरि विष्णुच सर्वांचे रक्षक आणि अविनाशी प्रभु आहेत असे सांगत होते. तेच या सृष्टी चे निर्माणकर्ता आहेत. नंतर 5 वर्षांच्या लीला शरीरात कबीरजींनी श्रीमत देवीभागवत, हिंदी टीकेसह, तिसऱ्या स्कंध, पृष्ठ 123 वरून प्रमाण देत स्वामीजींच्या बोलण्याचा निषेध केला. स्वामीजींनी विचारल्यावर कबीरजींनी आपल्या गुरुंचं नाव स्वामी रामानंद जी असल्याचं सांगितलं. यावर रागावून स्वामीजी तिथून उठून निघून गेले. परंतु दुसऱ्या दिवशीच त्यांनी कबीरजींशी चर्चा केली. काही काळानंतर स्वामी रामानंदजी ध्यानधारणा करू लागले, ज्यामध्ये ते श्रीकृष्णांची काल्पनिक मूर्ती तयार करून त्यांचं ध्यान करत असत. ध्यान करत असतानाच श्रीकृष्णांच्या मूर्तीला आंघोळ घालून, त्यांचे कपडे बदलून, हातात बासरी ठेवून, कपाळावर तिलक लावून आणि मुकुट घालू लागले, परंतु त्यांच्या गळ्यात माळ घालणं त्यांना विसरलं गेलं. स्वतःच्या मुकुटाच्या वरून माळ घालण्याचा प्रयत्न करतात, जी मुकुटात अडकते. या संभ्रमात ते चिंताग्रस्त होतात.[१२] कबीर साहेब, जे कुटीच्या बाहेर होते, पडद्याच्या मागून सुचवतात, "स्वामीजी, तुम्ही माळेची दोरी सोडून ती गळ्यात घाला." स्वामी रामानंदजी हा चमत्कार पाहून लगेचच पडदा हटवून कबीर साहेबांना मिठी मारतात. तेव्हा कबीरजींनी त्यांना पूर्ण ज्ञान दिलं आणि अविनाशी लोकाचं दर्शन घडवलं. कबीरजींनी स्वामी रामानंदजींना गुरू परंपरा टिकवून ठेवण्यासाठी जगासमोर गुरू म्हणून स्वीकारलं.[१३] स्वामी रामानंदांनी भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी देशभर प्रवास केला. त्यांनी जगन्नाथ पुरी आणि दक्षिण भारतातील अनेक तीर्थस्थळांना भेट दिली आणि रामभक्तीचा प्रचार केला. रामभक्तीच्या पावन धारेला हिमालयाच्या पवित्र उंचाईंपासून खाली उतरवून स्वामी रामानंदांनी गरीब आणि वंचितांच्या झोपडीत पोहोचवलं. ते भक्ती मार्गाचे असे सोपान होते ज्यांनी भक्ती साधनेला नवा आयाम दिला. स्वामीजींनी भक्तीच्या प्रचारामध्ये संस्कृतऐवजी लोकभाषेला प्राथमिकता दिली. त्यांनी अनेक पुस्तकांची रचना केली, ज्यामध्ये "आनंद भाष्य" वर टीका समाविष्ट आहे. "वैष्णवमताब्ज भास्कर" ही देखील त्यांची प्रमुख रचना आहे.

वारसा

संपादन
 
रामानंद आणि कबीर यांचे चित्रित हस्तलिखित चित्रण

रामानंद यांना उत्तर भारतातील संत-परंपरेचे (प्रत्यक्षात, भक्ती संतांच्या परंपरेचे) संस्थापक म्हणून सन्मान दिला जातो.[१४] त्यांच्या प्रयत्नांनी, जेव्हा उत्तर भारतातील गंगेच्या मैदानावर इस्लामिक सत्ता होती, हिंदूंना रामभक्तीच्या वैयक्तिक आणि थेट भक्तीरूपात पुनरुज्जीवित आणि पुनर्रचना करण्यास मदत केली. त्यांचा उदारमतवाद आणि भक्ताच्या प्रतिबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे, जन्म किंवा लिंग याऐवजी, विविध जीवनशैलीतून आलेल्या लोकांना अध्यात्माकडे आकर्षित करण्याचा आदर्श निर्माण केला. संस्कृतऐवजी स्थानिक भाषेचा वापर करून त्यांनी आध्यात्मिक कल्पना मांडल्यामुळे, जनतेसाठी विचारमंथन आणि वाटचाल अधिक सुलभ झाली.[१५]

रामानंदाचे चौदा शिष्य

संपादन

रामानंदांचे चौदा प्रभावशाली शिष्य यामध्ये १२ पुरुष आणि २ महिला कवी-संतांचा समावेश होता. भक्तमाळानुसार, हे होते:[१६]


पुरुष विद्वान:

  1. आनंदानंद
  2. सूरसुरानंद
  3. सुखानंद
  4. नरहरिदास
  5. भावानंद
  6. विठ्ठलपंत कुलकर्णी
  7. भगत पीपा
  8. कबीर
  9. रविदास
  10. सेन
  11. धनना
  12. साधना

महिला विद्वान:

  1. सूरसुरी
  2. पद्यावती

पोस्टमॉडर्न विद्वानांनी वरील गुरु-शिष्य परंपरेपैकी काहींचे प्रश्न उपस्थित केले आहेत, तर इतरांनी ऐतिहासिक पुरावे सादर करून या परंपरेला समर्थन दिले आहे.

साहित्यिक रचना

संपादन

रामानंद यांना अनेक भक्तिपूर्ण कवितांचे लेखक मानले जाते, परंतु बहुतेक भक्ती चळवळीच्या कवींप्रमाणे, या कवितांचे ते खरोखर लेखक होते का, हे स्पष्ट नाही. हिंदीतील दोन ग्रंथ, ज्ञान-लीला आणि योग-चिंतामणी हे देखील रमानंद यांच्याशी संबंधित मानले जातात, तसेच संस्कृत ग्रंथ वैष्णव मताब्ज भास्कर आणि रामार्चना पद्धती यांचाही त्यात समावेश आहे. तथापि, शीख धर्माच्या मूळ आणि चांगल्या प्रकारे संरक्षित हस्तलिखितांमध्ये आढळलेल्या कविता आणि हस्तलिखित नागरी प्रचारिणी सभा यांना प्रामाणिक मानले जाते आणि त्या रमानंद यांच्या निर्गुण (गुणरहित देव) विचारधारेवर प्रकाश टाकतात.[१७]

सामाजिक सुधारणा

संपादन

रामानंद हे उत्तरेतील भारतातील प्रभावशाली सामाजिक सुधारक होते. त्यांनी ज्ञानाच्या शोधाला आणि थेट भक्तीच्या अध्यात्माला प्रोत्साहन दिले, तसेच जन्म कुटुंब, लिंग किंवा धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव केला नाहीं.

रचना संसार

संपादन

स्वामी रामानंदाचार्य यांनी रचलेल्य ग्रंथांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

(1) वैष्णवमताब्ज भास्कर: (संस्कृत),
(2) श्रीरामार्चनपद्धतिः (संस्कृत),
(3) ब्रह्म सूत्र आनन्दभाष्य (संस्कृत),
(4) उपनिषद् आनन्दभाष्य (संस्कृत),
(5) श्रीमद् भगवदगीता आनन्दभाष्य (संस्कृत),

यासंदर्भात पाहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Ronald McGregor (1984), Hindi literature from its beginnings to the nineteenth century, Otto Harrassowitz Verlag, आयएसबीएन 978-3447024136, pages 42-44
  2. ^ a b Schomer and McLeod (1987), The Sants: Studies in a Devotional Tradition of India, Motilal Banarsidass, आयएसबीएन 9788120802773, pages 4-6
  3. ^ Enzo Turbiani (Editor: RS McGregor, 1992), Devotional Literature in South Asia, Cambridge University Press, आयएसबीएन 978-0521413114, page 51
  4. ^ Datta, Amaresh (1987). Encyclopaedia of Indian Literature: A-Devo, Volume 1. Sahitya Akademi. p. 79. ISBN 9788126018031.
  5. ^ Charlotte Vaudeville (1974), Kabir, Vol. 1, Oxford University Press, आयएसबीएन 978-0198265269, pages 110-117
  6. ^ Selva Raj and William Harman (2007), Dealing with Deities: The Ritual Vow in South Asia, State University of New York Press, आयएसबीएन 978-0791467084, pages 165-185
  7. ^ Ramdas Lamb (2008), Theory and Practice of Yoga (Editor: Knut A Jacobsen), Motilal Banarsidass, आयएसबीएन 978-8120832329, pages 317-330
  8. ^ Richard Burghart (1978), The Founding of the Ramanandi Sect, Ethnohistory, Vol. 25, No. 2, pages 121-139
  9. ^ Nirmal Dass (2000), Songs of the Saints from the Adi Granth, State University of New York Press, आयएसबीएन 978-0791446843, page 160-164
  10. ^ Winnand Callewaert (2015), The Hagiographies of Anantadas: The Bhakti Poets of North India, Routledge, आयएसबीएन 978-1138862463, pages 405-407
  11. ^ Edmour J Babineau (2008) , love of God and Social Duty in the Rāmcaritmānas , Motilal Banarsidass {{ISBN | 978-812082399033, pages 66-67
  12. ^ Schomer and McLeod (1987), The Sants: Studies in a Devotional Tradition of India, Motilal Banarsidass, आयएसबीएन 9788120802773, page 54
  13. ^ Julia Leslie (1996), Myth and Mythmaking: Continuous Evolution in Indian Tradition, Routledge, आयएसबीएन 978-0700703036, pages 117-119
  14. ^ Antonio Rigopoulos (1993), The Life And Teachings Of Sai Baba Of Shirdi, State University of New York Press, आयएसबीएन 978-0791412671, page 37
  15. ^ Edmour J Babineau (2008), Love of God and Social Duty in the Rāmcaritmānas, Motilal Banarsidass, आयएसबीएन 978-8120823990, pages 65-68
  16. ^ Rekha Pande (2014), Divine Sounds from the Heart—Singing Unfettered in their Own Voices, Cambridge Scholars, आयएसबीएन 978-1443825252, page 77
  17. ^ William Pinch (1996), Peasants and Monks in British India, University of California Press, आयएसबीएन 978-0520200616, pages 53-89