राणी कॅमिला (जन्मनाव: कॅमिला रोझमेरी शँड, नंतर पार्कर बोल्स; १७ जुलै, १९४७ - लंडन, इंग्लंड - ) ही इंग्लंडच्या तिसऱ्या चार्ल्सची पत्नी आहे. यायोगे ती युनायटेड किंग्डम आणि इतर १४ राष्ट्रकुलातील देशांची राणी आहे. [Note १]

कॅमिला इंग्लंडमधील पूर्व ससेक्स आणि दक्षिण केन्सिंग्टन येथे वाढली. तिचे शिक्षण इंग्लंड, स्वित्झर्लंड आणि फ्रांसमध्ये झाले. १९७३मध्ये तिने ब्रिटीश लश्करातील अधिकारी अँड्रु पार्कर बोल्सशी लग्न केले. १९९५मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. कॅमिला आणि चार्ल्स त्यांच्या पहिल्या लग्नाच्या आधी आणि दरम्यानही वेळोवेळी प्रेमात होते. चार्ल्सची पत्नी डायनाच्या मृत्यूनंतर २००५ मध्ये, कॅमिलाने चार्ल्सशी विंडसर गिल्डहॉलमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नापासून ते चार्ल्सच्या राज्यारोहणापर्यंत तिला डचेस ऑफ कॉर्नवॉल म्हणून ओळखले जात असे. ८ सप्टेंबर २०२२ रोजी, चार्ल्स त्याच्या आईच्या, राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर राजा झाला. चार्ल्स आणि कॅमिलाचा राज्याभिषेक ६ मे, २०२३ रोजी वेस्टमिन्स्टर ॲबे येथे झाला.

राज्याभिषेक दिनी कॅमिला

संदर्भ संपादन


चुका उधृत करा: "Note" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="Note"/> खूण मिळाली नाही.