राजीव पाटील (२७ मार्च, इ.स. १९७२; नाशिक, महाराष्ट्र - ३० सप्टेंबर, इ.स. २०१३; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक होते.

राजीव पाटील
जन्म २७ मार्च, इ.स. १९७२ [१]
नाशिक, महाराष्ट्र
मृत्यू ३० सप्टेंबर, इ.स. २०१३
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र चित्रपट (दिग्दर्शन)
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट जोगवा (इ.स. २००९)
सनई-चौघडे (इ.स. २००८)

कारकीर्दसंपादन करा

राजीव पाटील मूळचे नाशिकचे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते [२]. नाशकातल्या प्रयोग परिवार या नाट्यसंस्थेच्या नाटकांमधून त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली [३]. चित्रपटक्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी ते मुंबईस गेले. तेथे त्यांनी अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी या नामवंत दिग्दर्शकांकडे साहाय्यक म्हणून काम केले [२].

चित्रपट-कारकीर्दसंपादन करा

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग टिप्पणी
इ.स. २००४ सावरखेड एक गाव मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
इ.स. २००८ सनई-चौघडे मराठी दिग्दर्शन
इ.स. पांगिरा मराठी दिग्दर्शन
इ.स. २००९ जोगवा मराठी दिग्दर्शन
इ.स. २०१३ ७२ मैल एक प्रवास मराठी दिग्दर्शन
इ.स. २०१३ वंशवेल मराठी दिग्दर्शन प्रकाशनपूर्व अवस्थेत

मृत्यूसंपादन करा

पाटील यांचे वयाच्या ४०व्या वर्षी ३० सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी मुंबईत हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मूळ गावी - नाशिक येथे - त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले [४].

अखेरच्या दिवसांमध्ये पाटील "वंशवेल" नावाच्या मराठी चित्रपटावर काम करत होते, जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शीत झाला. [५].

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ "जोगवा डायरेक्टर राजीव पाटील नो मोर" (इंग्लिश भाषेत). ५ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. a b "राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन". २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "दिग्दर्शक राजीव पाटील यांचं निधन". २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "दिग्दर्शक राजीव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन". २ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "राजीव पाटील यांना अखेरचा निरोप!".


बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.