राघवेंद्र सिंग चौधरी

जन्म १९ सप्टेंबर १९१०- मृत्यू १३ जून २००० हे DLF भारतातीलच नव्हेतर जगातील सर्वात मोठ्या घर बांधणी कंपनीचे संस्थापक आणि दिल्ली विधानसभेचे सदस्य होते.

शिक्षण

संपादन

२२व्या वर्षी कायद्याची पदवी घेतली.

देशभक्ती

संपादन

DLF कंपनीच्या वेबसाईट वरील चरीत्रानुसार दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते ब्रिटिश सैन्यात स्वतःहून सहभागी झाले (इ.स १९४०) तसेच इतरही लोकांना सैन्यात भरती करून घेण्याचा प्रयत्न केला या नात्याने ते मोठे देशभक्त होते.(संदर्भ:http://www.dlf.in/dlf/dlffounder/life-journey.html Archived 2014-05-07 at the Wayback Machine.)

बांधकाम व्यवसाय

संपादन

दिल्लीत DLF कंपनीची १९४६ मध्ये स्थापना करून दक्षिण दिल्लीत २१ कॉलन्यांच्या विकसन आणि बांधकामाची कामे केली .नुकत्याच भारताच्या फाळणीमुळे विस्थापीत होऊन आलेल्यांना मुळे घरांची टंचाई होती या पार्श्वभूमीवर हा एक हितकारक व्यावसायिक निर्णय होता.व्यावसायिक हितांच्या दृष्टीने दिल्ली आणि आसपासच्या परिसरात DLF कपंनीने मोठ्या जमिनींची खरेदी करून ठेवली. या पुढे १९५० नंतर दिल्ली आणि हरियाणातील जमिनीच्या विकसनाचे नियम शासनाने बदलून खाजगी कंपन्यांना करू न देण्याचे धोरण अवलंबल्या नंतर जवळपास १९८० पर्यंत चौधरी साहेबांनी आपले लक्ष को ऑपरेटीव्ह बॅॅंकींग आणि राजकारणाकडे वळवले. १९८० मध्ये चौधरी साहेबांचे जावई आणि राजीव गांधींच्या *'अचानक' - (* राजीवजींची जीप अचानक कुठेशी बंद पडली आणि नेमके त्या ठिकाणी चौधरी साहेबांचे जावई विश्रांती घेत होते अशी ऑनलाईन वृत्तपत्रीय आख्यायिका वाचण्यास मिळते)- झालेल्या भेटी नंतर हरयाणा सरकारने आपले नियम बदलून खाजगी कंपन्यांना जमिनी विकसनास मान्यता दिली असे मानले जाते. कंपनीचा विकास साधताना त्यानंतर चौधरी साहेब, त्यांचे जावई आणि DLF ने मागे वळून पाहिले नाही.