रवी शंकर प्रसाद
भारतीय राजकारणी
(रविशंकर प्रसाद या पानावरून पुनर्निर्देशित)
रवी शंकर प्रसाद ( ३० ऑगस्ट १९५४) हे एक भारतातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
रवी शंकर प्रसाद | |
दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री
| |
विद्यमान | |
पदग्रहण ९ नोव्हेंबर २०१४ | |
पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
---|---|
मागील | कपिल सिबल |
कायदा व न्याय मंत्री
| |
कार्यकाळ २६ मे २०१४ – ९ नोव्हेंबर २०१४ | |
पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
मागील | कपिल सिबल |
पुढील | सदानंद गौडा |
जन्म | ३० ऑगस्ट, १९५४ पाटणा, बिहार |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | माया शंकर |
पेशाने वकील असलेल्या प्रसाद ह्यांनी १९७० च्या दशकादरम्यान जयप्रकाश नारायण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. ते २००० साली राज्यसभेवर निवडून गेले व अटलबिहारी वाजपेयी मंत्रीमंडळामध्ये कोळसा व खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री बनले.
२०१४ लोकसभा निवडणुकांनंतर रवी शंकर प्रसाद नरेंद्र मोदी सरकारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.