रमाई (चित्रपट)

(रमाई या पानावरून पुनर्निर्देशित)


रमाई हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वीणा जामकर आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.[१][२][३]

रमाई
दिग्दर्शन बाळ बरगाले
निर्मिती प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, व चंद्रकांत खरात
कथा डॉ. अरुण मिरजकर
प्रमुख कलाकार वीणा जामकर
सागर तळाशीकर
संवाद डॉ. अरुण मिरजकर
गीते
गीतकार
प्रा. भिमराव धुळबुळू, प्रा. गोपाळ कबनुरकर
संगीत मधु-कृष्णा, अप्रल रोमन
पार्श्वगायन आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे, विजय सरतापे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १२ एप्रिल २०१९

निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.[४][५]

कलाकार संपादन

  • वीणा जामकर — रमाबाई आंबेडकर
  • सागर तळाशिकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • अरुण नलावडे
  • स्वनिल राजशेखर
  • प्रफुल्ल सामंत
  • प्रकाश धोतरे

संबंधित व्यक्ती संपादन

  • दिग्दर्शक : बाळ बरगाले
  • निर्माते : प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, व चंद्रकांत खरात
  • कथा लेखक/ संवादलेखन: डॉ. अरुण मिरजकर
  • गीतकार : प्रा. भिमराव धुळबुळू, प्रा. गोपाळ कबनुरकर
  • संगीतकार : मधु-कृष्णा, अप्रल रोमन
  • गायक : आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे, विजय सरतापे

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ author/lokmat-news-network. "रमाई या चित्रपटात वीणा जामकर दिसणार रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेत". Lokmat. 2020-03-08 रोजी पाहिले.
  2. ^ "वीणा जामकर "रमाई"च्या भूमिकेत". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-03-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Actress Veena Jamkar to act as Ramabai Ambedkar in 'Ramai' | Marathi Movie News - Times of India". web.archive.org. Archived from the original on 2019-04-23. 2020-03-08 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ Patil, Parashuram. "रमाई' चित्रपटाचा प्रिमियर शो गुरूवारी". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2020-03-08 रोजी पाहिले.
  5. ^ "अखेर 'रमाई'च्या रूपात अवतरणार वीणा!". Mumbai Live. 2020-03-08 रोजी पाहिले.