डॉ. यशवंत लक्ष्मण नेने (जन्म : ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, भारत, २४ नोव्हेंबर १९३६) हे भारतीय कृषी शास्त्रज्ञ आहेत.

शिक्षण

संपादन

नेने यांचे शिक्षण ग्वाल्हेर, कानपूरअमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात झाले. वनस्पतींतील विकृती व विषाणू विज्ञान हे त्यांचे विषय होते. ते उत्तर प्रदेशातील पंतनगर येथील कृषी विद्यापीठात १४ वर्षे प्राध्यापक होते. त्यानंतर ते आंध्र प्रदेशात गेले.

भारतातील बरीचशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने कोरडवाहू जमिनीत कोणती पिके काढता येतील यावरील संशोधनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. आंध्र प्रदेशच्या पतनचेरू भागात इक्रिसॅट (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर द सेमी ॲरिड ट्रॉपिक्स) नावाची संस्था संशोधन करत असून तिथे उपमहासंचालक या पदावर नेने काम करीत होते. डाळीच्या पिकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी तेथे त्यांच्याकडे होती. अन्नद्रव्यांवरील संशोधनाची सुरुवात प्रथमच करून तांदळावरील खैरा रोग जस्ताच्या कमतरतेमुळे होतो हे त्यांनी सिद्ध केले. गव्हावरील रोगांवरही त्यांनी विशेष काम केले. त्या काळात डॉ. नेने व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्लान या रोगाला तोंड देणाऱ्या हरभऱ्याच्या जातीचा विकास केला. याकरिता डाळीचे सुधारित बियाणे त्यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. यामुळे हेक्टरी तिप्पट उत्पादन मिळू लागले. याकरिता कमी उंचीच्या जाती विकसित करून दिल्यामुळे कीटकनाशकांचा सहज वापर करता येऊ लागला. पीक तीन-चार महिन्यांत तयार होत असल्यामुळे तुरीच्या शेंगा खुडून ते पीक तसेच ठेवून एकाच झाडापासून वर्षांत दोन ते तीन वेळा शेंगा तोडायची सोय झाली. परिणामी, हेक्टरी ६०० ऐवजी २००० किलोग्रॅम पीक घेता आले. यासाठी डॉ. नेने यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

नेने यांनी अनेक देशी-विदेशी कृषि परिषदा आयोजित केल्या. निवृत्तीनंतर त्यांनी सिकंदराबाद येथे एशियन ॲग्रि-हिस्टरी फाउंडेशन ही संस्था स्थापून त्याचे काम पाहिले. आग्नेय आशियात कृषिउत्पन्नाची समृद्धी असल्यामुळे येथील शेतीविषयक जुने वाङ्मय मिळवून त्यांनी ते इंग्लिश, हिंदी व मराठीत छापले. त्याप्रमाणे आतापर्यंत वृक्षायुर्वेद, कृषिशासनम्, कृषिपराशर, लोकोपकार वगैरे पुस्तके तयार झाली आहेत. संस्थेद्वारे एक त्रैमासिकही त्यांनी सुरू केले.

एशियन ॲग्रि-हिस्टरी फाउंडेशन या संस्थेने प्रकाशित केलेली पुस्तके

संपादन
  • उपवन विनोद (मूळ लेखक शारंगधर)
  • काश्यपीय कृषिसूक्ती (मूळ लेखक कश्यप)
  • कृषि गीता (मूळ मल्याळम भाषेत, लेखक परशुराम)
  • कृषिपराशर (मूळ लेखक पराशर)
  • मृग-पक्षी शास्त्र (मूळ लेखक १३व्या शतकातील हंसदेव; मराठी भाषांतर मारुती चितमपल्ली आणि भातखंडे)
  • लोकोपकार (मूळ कानडी, लेखम चावुंडराय)
  • विश्ववल्लभ (संस्कृतमधील या मूळ पुस्तकाचे लेखक महाराणा प्रताप यांच्या दरबारातील चक्रपाणि मिश्र)
  • वृक्षायुर्वेद (मूळ लेखक सूरपाल)
  • Ancient History of Indian Agriculture
  • Glimpses of the Agricultural Heritage of India
  • Revitalizing Higher Agricultural Education in India

कौटुंबिक माहिती

संपादन

त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  • [१] वृक्षायुर्वेद