आफ्रो-युरेशिया
(युराफ्रिशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
आफ्रो-युरेशिया हा पृथ्वीवरील एक अतिविशाल प्रदेश आहे. काही संकेतांनुसार आफ्रो-युरेशिया हा एक महाखंड मानला जातो. आफ्रो-युरेशियामध्ये युरेशिया व आफ्रिका ह्या दोन खंडांचा समावेश होतो. युरेशिया खंड युरोप व आशिया ह्या खंडांचा मिळून बनला आहे.
आफ्रो-युरेशियामध्ये ५.७ अब्ज लोक (जगाच्या लोकसंख्येच्या ८५%) राहतात.