युकातान द्वीपकल्प
युकातान द्वीपकल्प हा मेक्सिको देशाच्या आग्नेय भागातील एक द्वीपकल्प आहे. हा भूभाग मेक्सिकोच्या आखाताला कॅरिबियन समुद्रापासून अलग करतो. ह्या द्वीपकल्पावर मेक्सिकोची युकातान, कांपेचे व किंताना रो ही राज्ये तसेच बेलिझ व ग्वातेमाला देशांचा काही भाग स्थित आहे.
अर्वाचीन काळात माया संस्कृतीचा मुख्य प्रदेश असणाऱ्या युकातान द्वीपकल्पावर ह्या साम्राज्याच्या चिचेन इत्सा व इतर अनेक खुणा आढळतात.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत