यारा नदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
यारा नदी ऑस्ट्रेलियातील नदी आहे. या नदीकाठी मेलबर्न शहर वसलेले आहे.
पाणलोट क्षेत्रामधील देश | व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया |
---|---|
लांबी | २४२ किमी (१५० मैल) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ७,१८,००० |
ब्रिटिश वसाहतींपूर्वकालात या नदीकाठी राहणाऱ्या वुरुन्ड्जेरी लोकांनी या नदीचे नाव बिर्रारंग असे दिले होते. शहरातील नदीचा काठ बांधलेला आहे. या काठावरच क्राऊन कॅसिनो व इतर आकर्षणे आहेत. नदीकाठाला लागून फ्लिंडर्स स्ट्रीट हे रेल्वे स्थानक आहे. फेडरेशन स्क्वेर हे आकर्षणही नदी काठालाच आहे. नदीमध्ये अनेक लोक कायाकींग करत असतात. कायाकींगचे प्रशिक्षण देणारी एक संस्थाही नदीच्या काठावरच आहे. तसेच नदीमधून विल्यम्स टाऊन या उपनगरात जाण्यासाठी मोटारबोट टॅक्सी किंवा फेरी सेवा आहे.