यशोधरा

महान बौद्ध भिक्षुणी


राजकुमारी यशोधरा ही महान बौद्ध भिक्षुणी होती. ती राजा सुप्पबुद्ध आणि राणी पमिता यांची कन्या होत. तिची आई- पमिता ही राजा शुद्धोधनाची बहीण होती. वयाच्या १६व्या वर्षी राजकुमारी यशोधरेचा विवाह राजा शुद्धोधनाचे पुत्र राजकुमार सिद्धार्थ (गौतम बुद्ध) याच्याशी झाला. यशोधरा व सिद्धार्थाला राहुल नावाचा पुत्र झाला. नंतर राजकुमार सिद्धार्थ याने संन्यासी होऊन ज्ञान प्राप्त केले व ते गौतमबुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पतीच्या गृहत्यागानंतर यशोधरेने आपला मुलगा राहुल याचे पालन पोषण केले. पती संन्यासी झाले म्हणून यशोधरेनेही मूल्यवान वस्त्रे, अलंकार त्यागून ती साधारण, पण संता सारखे आयुष्य जगू लागली. राहुलने बुद्धसंघात प्रवेश केला. महाप्रजापती गौतमी समवेत यशोधराही बुद्धांकडून सर्वप्रथम महिला म्हणून धम्म दीक्षा घेऊन भिक्षुणी बनली आणि अरहंत या अत्युच्च पदापर्यंत जाऊन पोहोचली.

राजकन्या यशोधरा

बुद्धांसोबत यशोधरा आणि राहुल (डाव्या बाजूस तळाला), अंजिठा लेणी
मूळ नाव यशोधरा
जन्म इ.स.पू. ६ वे शतक
निर्वाण इ.स.पू. ५ वे शतक
गुरू गौतम बुद्ध
भाषा पाली
कार्य बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार
संबंधित तीर्थक्षेत्रे सांची
व्यवसाय राणी, नंतर भिक्खुणी
वडील राजा सुप्पबुद्ध
आई राणी पमिता
पती गौतम बुद्ध
अपत्ये राहुल
विशेष माहिती जगातील पहिल्या भिक्षुणींपैकी एक

यशोधरेच्या जीवनावर अनेक साहित्य रचना झाल्या आहेत, त्यांपैकी मैथिलीशरण गुप्त यांचे 'यशोधरा' हे हिंदी खंडकाव्य प्रसिद्ध आहे.