मोहम्मद मोसादेक (फारसी: مُحَمَد مُصَدِق; १६ जून, इ.स. १८८२:तेहरान, इराण - ५ मार्च, इ.स. १९६७) हा १९५१ ते १९५३ दरम्यान इराण देशाचा पंतप्रधान होता. लोकशाही मार्गाने निवडून सत्तेवर आलेल्या मोसादेकने इराणमधील खनिज तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली. त्याने १९१३ सालापासून ह्या उद्योगावर असलेले ब्रिटनचे नियंत्रण काढून घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्याच्या ह्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या ब्रिटनने अमेरिकेच्या सी.आय.ए. ह्या गुप्तहेर संघटनेसोबत संगनमत करून मोसादेकला सत्तेवरून हाकलवून लावण्याचे कारस्थान रचले. सी.आय.ए.ने ऑगस्ट १९५३ मध्ये रचलेल्या राजकीय बंडामध्ये शहा मोहम्मद रझा पेहलवीने मोसादेकचे पंतप्रधानपद बरखास्त करून सत्तेचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात घेतले. तेव्हापासून १९७९ पुढील २६ वर्षे सालच्या इराणी क्रांतीपर्यंत पेहलवी राज्यपदावर होता.

मोहम्मद मोसादेक

मोसादेकला इराण सरकारने ३ वर्षांचा तुरुंगवास सुनावला व त्यानंतर मृत्यूपर्यंत तो स्वतःच्या घरात नजरकैदेमध्ये होता. मोसादेक इराणमध्ये प्रचंड लोकप्रिय होता.

बाह्य दुवे

संपादन