मोनिषा साराभाई (काल्पनिक पात्र)

मोनिषा सिंग साराभाई हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. साराभाई वर्सेस साराभाई या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत रुपाली गांगुलीने मोनिषाची भूमिका केली. ही मालिका २००४ साली जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एक उच्चवर्गीय कुटुंबाची कथा आहे.[१][२]

मोनिषा साराभाई
RupaliGanguly.jpg
रुपाली गांगुलीने मोनिषाची भूमिका केली
जन्म मोनिषा सिंग
निवासस्थान कफ परेड, मुंबई
नागरिकत्व भारतीय
मूळ गाव नोएडा, दिल्ली
जोडीदार साहील साराभाई
अपत्ये
  • अर्णब
नातेवाईक
  • माया साराभाई (सासू)
  • इंद्रवदन साराभाई (सासरा)
  • साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतील पात्र


    मोनिषा एक मध्यमवर्गीय मुलगी आहे. ती दिल्लीजवळच्या नोएडातील एका पंजाबी कुटूंबातील आहे आणि आता साराभाईंची सून आहे. ती क्वचितच घराची साफसफाई करते आणि टीव्हीवर नेहमी मालिका पाहत राहते. साहिलची बायको असलेल्या मोनिषाच्या मध्यमवर्गीय सवयी माया साराभाई, तिच्या सासूला खूप त्रासदायक असतात. ज्याच्यामुळे माया उच्चवर्गीय टोमणे मोनिषाला मारत राहते. हे टोमणे कार्यक्रमात विनोद प्रचंड प्रमाणात विनोद निर्माण करत राहतात. मायाचे वाक्य "It's so middle class!" प्रचंड गाजले.[३] आजही मायाचे हे वाक्य आणि इतर टोमणे इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर नेहमी व्हायरल होत असतात. मोनिषा हे नाव लोकप्रिय होण्यामागे मायाच्या हे टोमणेच कारणीभूत आहेत.[४][५]

    संदर्भसंपादन करा

    1. ^ "Sarabhai vs Sarabhai Take 2 first episode review: This time it is funnier and more insane - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.
    2. ^ March 23, Anvita Singh; March 23, 2017UPDATED:; Ist, 2017 17:39. "These characters of Sarabhai vs Sarabhai deserve more love". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
    3. ^ "15 Most Hilarious Digs That Maya Hurled At Monisha in 'Sarabhai Vs Sarabhai'". News18. 2022-01-27 रोजी पाहिले.
    4. ^ Khalid, Maryam (2020-04-25). "23 Hilarious 'Monisha Beta' Jokes You'll Only Get If You've Seen 'Sarabhai Vs Sarabhai'". MangoBaaz. 2022-01-27 रोजी पाहिले.
    5. ^ Bhatt, Abhijeet (2018-03-06). "16 Hilarious 'Middle Class' Moments By Monisha From Sarabhai Vs Sarabhai". www.scoopwhoop.com (English भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)