साराभाई वर्सेस साराभाई

भारतीय सिटकॉम

साराभाई वर्सेस साराभाई (इंग्रजी: Sarabhai vs Sarabhai) ही एक भारतीय हिंदी-भाषेतील टिव्हीवरील सिटकॉम मालिका आहे जी १ नोव्हेंबर २००४ ते १६ एप्रिल २००६ ह्या दरम्यान स्टार वन ह्यावर आणि १५ मे २०१७ ते १५ जुलै २०१७ ह्या दरम्यान डिस्ने+ हॉटस्टार ह्यावर दोन सिझन साठी प्रसारित झाली होती. ही मालिका देवेन भोजानी यांनी दिग्दर्शित केला होता आणि हॅट्स ऑफ प्रॉडक्शन ह्याच्या बॅनरखाली जमनादास मजेठियाआतिश कपाडिया यांनी निर्मिती केली होती. सतीश शाह, रत्ना पाठक शाह, सुमीत राघवन, रुपाली गांगुली, राजेश कुमार, देवेन भोजानीअरविंद वैद्य यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका दक्षिण मुंबई ह्यातील कफ परेड मधल्या अपमार्केट परिसरात राहत असलेल्या एका सर्वार्थाने उच्च दर्जाच्या कुटुंबाबद्दल आहे. त्याच्या सुरुवातीच्या रिलीजच्या वेळी त्याच्या संकल्पना, लेखन आणि सरासरी दर्शक रेटिंगच्या बाबतीत त्याच्या पिढीच्या पुढे असल्याचे मानले जाते, ही मालिका एक कल्ट क्लासिक बनली आहे.

साराभाई वर्सेस साराभाई
दूरचित्रवाहिनी स्टार वन (भाग १)
हॉटस्टार (भाग २)
भाषा हिंदी
प्रकार सिटकॉम
विनोदी
देश भारत
निर्माता जमनादास मजेठिया
आतिश कपाडिया
दिग्दर्शक देवेन भोजानी

आतिश कपाडिया

निर्मिती संस्था हॅट्स ऑफ प्रॉडक्शन
कलाकार सतीश शाह
रत्ना पाठक शाह
सुमीत राघवन
रुपाली गांगुली
राजेश कुमार
देवेन भोजानी
अरविंद वैद्य
प्रसारण माहिती
बाह्य दुवे
संकेतस्थळ

सारांश

संपादन

ही मालिका उच्चवर्गीय गुजराती साराभाई कुटुंबाच्या जीवनाभोवती फिरते जे दक्षिण मुंबई येथील कफ परेड मधल्या आलिशान अपार्टमेंट इमारतीत राहतात. या कुटुंबात एका बहुराष्ट्रीय कंपनीचे माजी संचालक व ह्या कुटुंबातील विनोदी पात्र, इंद्रवदन (सतीश शाह), आणि समाजवादी व दांभिक समाजसेवक, माया (रत्ना पाठक शाह), यांचा समावेश आहे, ज्यांना तीन मुले आहेत व प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं असतं.

इंद्रवदन आणि माया यांचे पहिले मूल, डॉ. साहिल (सुमीत राघवन), एक कॉस्मेटोलॉजिस्ट आहे जो त्यांच्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये त्याची मध्यमवर्गीय पंजाबी पत्नी, मोनिषा (रुपाली गांगुली), हिच्यासोबत राहतो. साहिल इतर पात्रांच्या तुलनेत अतिशय संयोजित आहे, तर मोनिषा घर क्वचितच साफ ठेवते व आळशीपणा दाखवत टिव्हीवर दररोजच्या मालिका बघते. मोनिषाच्या मध्यमवर्गीय पैशाची बचत करण्याच्या पद्धती मायाला नेहमी त्रासदायक असतात व ती सतत "हलके-फुलके विनोद" आणि व्यंग वापरून तिला अपमानित करते. मायाचा कॅचफ्रेज आहे "इट्स कॅटास्ट्रॉफिकली मिडल-क्लास!" (इंग्रजी: "It's catastrophically middle-class!", मराठी: "हे आपत्तीजनक मध्यमवर्गीय आहे!") आणि जेव्हा केव्हा की मोनिषाला टोमणा मारते, टोमणेच्या तीव्रतेवर अवलंबून पार्श्वभूमीत एक ते तीन बंदुकीच्या गोळ्या ऐकू येतात व या परिस्थितीत विनोद वाढतो आणि मायाला शाब्दिक गोळी म्हणून चित्रित केले जाते. मोनिषाच्या तुलनेत माया इंद्रवदनच्या आहाराच्या आणि स्वच्छतेच्या सवयी सुधारण्यासाठी ही सतत त्याच्या मागे लागलेली असते. तिच्या आणि मायाच्या वादात इंद्रवदन नेहमीच मोनिषाची बाजू घेतो, तर साहिल अनेकदा दोघांमध्ये अडकतो आणि दोघांनाही न दुखावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. मोनिषा हिचं मूळ नाव "मनिषा" असे होते परंतु साहिलसोबत लग्न केल्यानंतर मायाने तिचे नाव "मोनिषा" असे ठेवले कारण तिला मनिषा हे नाव "अत्यंत मध्यमवर्गीय" आढळले.

इंद्रवदन आणि माया यांचे दुसरे मूल, सोनिया (क्षिती जोग / शीतल ठक्कर), ही एक सायकिक आहे जी मायाच्या काही समाजवादी वृत्तीचे प्रदर्शन करते व तिला काही तंत्राद्वारे भविष्य पाहण्याची क्षमता असते. सोनियाचे लग्न झालेलं असतं इलेक्ट्रिकल इंजिनिअर, दुष्यंत पेंटर (देवेन भोजानी), ह्याच्यासोबत ज्याला टोस्टर पासून ते फ्रिज पर्यंत ते लिफ्ट पर्यंत ते मोबाईल फोन पर्यंतच्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांबद्दल विचित्र आकर्षण असतं व त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मशीन्सबद्दल विविध सिद्धांत समजावून सांगायला आवडते. प्रत्येक वेळी कुठलं इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब झालं की दुष्यंत घरी येऊन अनावधानाने कुटुंबाला त्रास देतो आणि कुटुंबाकडून त्याचा खूप तिरस्कार होतो. दुष्यंतचे कॅचफ्रेज आहे "आईल एक्सप्लेन!" (इंग्रजी: "I'll explain!", मराठी: "मी समजावून सांगीन!") आणि त्याला व्यंग समजत नाही ज्यामुळे विनोदी परिस्थिती निर्माण होते.

इंद्रवदन आणि माया यांचे तिसरे मूल, रोसेश (राजेश कुमार), हा आपल्या आई-वडिलांसोबत राहणारा अविवाहित तरुण आहे ज्याची मूर्ख कविता आणि अभिनय हे मालिकेसाठी सतत विनोदाचा स्रोत आहे. माया ही कुटुंबातील एकमेव सदस्य आहे जी रोसेशच्या कवी व अभिनेता बनण्याचा आकांक्षांना मान्यता देते आणि त्यांचे कौतुक करते, तर ह्याचीही खात्री करते की तो तिला उच्च समाजातील सून आणेल आणि मोनिषा सारखी अत्याधुनिक नाही. इंद्रवदनला रोसेशचा छळ करणे आणि त्याच्या ओनोमेटोपोईआ असलेल्या कवितेची व त्याला मायाची कठपुतली असल्यामुळे म्हणून टोमणे मारणे आवडते. साहिल आणि इंद्रवदन नेहमी रोसेशच्या विलक्षण आणि मनोरंजक आवाजाची तुलना बदकासारख्या प्राण्यांशी आणि मिक्सरसारख्या मशीनशी करतात. दुष्यंत त्याच्या सिद्धांत स्पष्टीकरणादरम्यान रोसेशचा नेहमी प्रात्यक्षिक म्हणून वापर करतो.

इंद्रवदनची थोरली बहीण, इलाबेन (रीता भादुरी), ही एक गोड, जिवंत व्यक्ती असते जी बऱ्याचदा इंद्रवदन आणि मायाला भेटते आणि त्यांच्या रोजच्या समस्या सोडवायला मदत करते. तिचा पती, मधुसूदन फुफा (अरविंद वैद्य), हा बहिरा व माजी स्वातंत्र्यसैनिक आहे जो श्रवणयंत्र वापरायला नकार देतो आणि सहसा ऐकू येत नाही हे सत्य मान्य करत नाही, त्यामुळे तो परतपरत प्रश्न विचारतो व हळु आवाजात बोलल्यामुळे दुसऱ्यांदा दोषी ठरवतो. मधुसूदन फुफा हा विशेषतः इंद्रवदनला त्रासदायक आहे आणि त्याच्या "है?" (मराठी: "काय?") या कॅचफ्रेजनं तो संभाषणांमध्ये जवळजवळ नेहमीच हस्तक्षेप करतो. इलाबेन मधुसूदन फुफा याच्याशी अत्यंत सहनशील असलेली आणि सांकेतिक भाषेतून त्यांच्याशी संवाद साधणारी ती कुटुंबातील एकमेव सदस्य आहे.

साराभाईंच्या आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या घटनांमध्ये कॉमेडी आणि संघर्ष निर्माण होतो. मालिकेतील बहुतांश सासूचा विनोद हा शहरातील उच्चभ्रू लोकांमधील उथळ संवाद आणि मध्यमवर्गीय समाजातील उणीवा आणि अपयशांबद्दलच्या त्यांच्या कल्पनांमधून प्राप्त झाला आहे. या मालिकेचा दर्जा एवढा आहे की सर्व भारतीय सिटकॉम मध्ये याला कल्ट क्लासिक मानला जाते.[]

कलाकार

संपादन
  • सतीश शाह - इंद्रवदन वल्लभदास साराभाई; मायाचा पती, साहिल, सोनिया व रोसेशचा पिता, मोनिषा व दुष्यंतचा सासरा, इलाबेनचा धाकटा भाऊ, मधुसूदन फुफाचा मेहुणा
  • रत्ना पाठक शाह - माया हर्षवर्धन मुजूमदार / माया इंद्रवदन साराभाई; इंद्रवदनची पत्नी, साहिल, सोनिया व रोसेशची आई, मोनिषा व दुष्यंतची सासू, इलाबेनची वहिनी, मधुसूदन फुफाची सहकारी वहिनी
  • सुमीत राघवन - डॉ. साहिल साराभाई; मोनिषाचा पती, इंद्रवदन व मायाचं पहिलं मूल, सोनिया व रोसेशचा थोरला भाऊ, दुष्यंतचा मेहुणा, इलाबेन व मधुसूदन फुफाचा भाचा
  • रुपाली गांगुली - मनिषा सिंग / मोनिषा साहिल साराभाई; साहिलची पत्नी, इंद्रवदन व मायाची सून, सोनिया व रोसेशची वहिनी, दुष्यंतची सहकारी वहिनी, इलाबेन व मधुसूदन फुफाची भाचेसून
  • राजेश कुमार - रोसेश इंद्रवदन साराभाई; इंद्रवदन व मायाचं तिसरं मूल, साहिल व सोनियाचा धाकटा भाऊ, मोनिषाचा दीर, दुष्यंतचा मेहुणा, इलाबेन व मधुसूदन फुफाचा भाचा
  • क्षिती जोग / शीतल ठक्कर - सोनिया इंद्रवदन साराभाई / सोनिया दुष्यंत पेंटर; दुष्यंतची पत्नी, इंद्रवदन व मायाचं दुसरं मूल, साहिलची धाकटी व रोसेशची थोरली बहीण, मोनिषाची नणंद, इलाबेन व मधुसूदन फुफाची भाची
  • देवेन भोजानी - दुष्यंत पेंटर; सोनियाचा पती, इंद्रवदन व मायाचा जावई, साहिल व रोसेशचा मेहुणा, मोनिषाचा सहकारी मेहुणा, इलाबेन व मधुसूदन फुफाचा भाचेजावई
  • रीता भादुरी - इलाबेन वल्लभदास साराभाई; मधुसूदन फुफाची पत्नी, इंद्रवदनची थोरली बहीण, मायाची नणंद, साहिल, सोनिया व रोसेशची आत्या, मोनिषा व दुष्यंतची आत्तेसासू
  • अरविंद वैद्य - मधुसूदन फुफा; इलाबेनचा पती, इंद्रवदनचा मेहुणा, मायाचा सहकारी मेहुणा, साहिल, सोनिया व रोसेशचा काका, मोनिषा व दुष्यंतचा आत्तेसासरा

प्रसारण

संपादन

मालिकेचा पहिला भाग २००४ ते २००६ दरम्यान स्टार वन वर प्रसारित झाला. या मालिकेचे पुनःप्रसारण स्टार उत्सव वाहिनीवर देखील प्रसारित झाले.[] दुसरा भाग डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर १५ मे २०१७ ते १७ जुलै २०१७ या कालावधीत रिलीज झाला.[] या मालिकेच्या दुसऱ्या भागासाठी खूप मोठ्या प्रमाणात विनंती करण्यात आली होती. कारण या मालिकेने अनेक वर्षांमध्ये अनेक वेळा प्रसारित होऊन प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. हा कार्यक्रम ६ एप्रिल २०२० पासून स्टार भारत वर प्रसारित करण्यात आला, कारण कोविड-१९ साथीमुळे चॅनलला चालू असलेल्या मालिकांची निर्मिती थांबवावी लागली.[]

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Lunching with the Sarabhais!". www.rediff.com. 2022-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "IT".
  3. ^ "EXCLUSIVE: Sarabhai vs Sarabhai Take 2 cast opens up about the new season; makers hint Khichdi might return as a web series". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-02 रोजी पाहिले.
  4. ^ "Sarabhai Vs Sarabhai and Khichdi are the latest shows to return on TV". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-02 रोजी पाहिले.