मोत्सु-जी
मोत्सु-जी (毛越寺 ) हे तेंडाई पंथाचे एक बौद्ध मंदिर आहे. ते जपानच्या दक्षिणेकडील इवाते प्रांतामधील हिराझुमी शहरात आहे. याच्या सभोवतालच्या ऐतिहासिक परिसरात दोन जुन्या मंदिरांचे अवशेष आहेत. ही मंदीरे एनरीयू-जी (圓隆寺?) आणि कशो-जी (嘉祥寺?) जोडो (शुद्ध जमीन) या बागेत आहेत. सध्याचे मंदिर १८ व्या शतकात बांधले गेले होते. पूर्वी येथे असलेल्या प्राचीन मंदिर संरचनांशी त्याचा कोणताही संबंध नाही. जून २०११ मध्ये, मोत्सु-जीची "हिरायझुमीची ऐतिहासिक स्मारके आणि स्थळे" म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव दाखल करण्यात आले.
मोत्सु-जी | |
---|---|
毛越寺 | |
The Pure Land garden of Mōtsū-ji.The rocks are arranged to represent the rocky coast of Iwate. | |
प्राथमिक माहिती | |
भौगोलिक गुणक | 38°59′16″N 141°06′29″E / 38.987817°N 141.108022°E |
देश | जपान |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" | |
संस्थापक | एनीन |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" | |
Type | Cultural |
Criteria | ii, iv |
Designated | 2011 |
Reference no. | 1277 |
इतिहास
संपादनमोत्सु-जीची स्थापना ८५० मध्ये एनिन (जिकाकू दाईशी) याने केली होती. त्या वेळी, हे क्षेत्र यामातो जपान आणि उत्तर होन्शुच्या तोहोकू प्रदेशातील एमिशी यांच्या दरम्यानची सीमा होती.
१२व्या शतकाच्या मध्यात, फुजिवारा नो मोतोहिरा, उत्तरेकडील फुजिवाराचा दुसरा स्वामी, याने येथे एनरीयू-जी नावाचे मंदिर बांधले. मोतोहिराचे वडील फुजिवारा नो कियोहिरा य्याआणॅ ११२८ मध्ये मृत्यूपूर्वी या जागेवर पूर्वीचे एनरीयू-जी बांधले असण्याचीही शक्यता आहे. तसे असल्यास, असे मानले जाते की हे मूळ मंदिर मोतोहिरा आणि त्याचा भाऊ कोरेतसुने यांच्यातील उत्तराधिकाराच्या युद्धात पूर्ण झाल्यानंतर लगेचच आगीत भस्मसात झाले. स.न. ११५० च्या सुमारास मोतोहिराने बांधलेले मंदिर त्याच्या वडिलांच्या मंदिराची प्रत असल्यासारखे आहे.
मोतोहिरा चे एनरीयू-जी कोणत्याही मानकांनुसार प्रेक्षणीय आहे. मुख्य सभामंडपात याकुशी न्योराई, उपचाराचा बुद्ध, बारा दैवी सेनापतींच्या (जुनी शिन्शो) स्मारकात्मक पुतळ्यांसह अनेक सुंदर गोष्टी येथे दिसून येतात.अनकेईने स्फटिकाच्या डोळ्यांनी शिल्पित केलेली स्मारकीय मूर्ती आहे. त्यावेळचा हॉल स्वतःच चमकदार रंगवलेला होता आणि मौल्यवान लाकूड, सोने, चांदी आणि दागिन्यांनी सजवलेला होता. मुख्य सभामंडप इतर इमारतींनी वेढलेला होता ज्यात एक व्याख्यान हॉल, एक परिक्रमा हॉल, एक दुमजली दरवाजा, एक घंटा टॉवर आणि एक सूत्र भांडार यांचा समावेश आहे. मंदिराच्या नावाचे फलक फुजिवारा नो तदामिची (藤原忠通 ) यांनी लिहिलेले होते आणि फुजिवारा नो नोरिनागा यांनी अलंकारिक कविता लिहिली होती.
मोत्सु-जीच्या ऐन उमेदीच्या काळात ४० इमारती आणि ध्यानासाठी ५०० सहाय्यक खोल्या होत्या. ज्यापैकी अनेकांच्या बांधकामात दुर्मिळ लाकूड आणि मौल्यवान साहित्य वापरले होते. ही पद्धत चुसन-जीच्या पद्धतीसारखीच होती.
उत्तर फुजिवारा वंशाच्या पडझडीनंतर, सर्व इमारती आगीमुळे नष्ट झाल्या. त्यानंतर स.न १२२६ पर्यंत एकतर नैसर्गिक कारणाने किंवा संघर्षामुळे हे मंदिर पूर्णपणे उध्वस्त झाले.[१]
वर्तमान स्थिती
संपादनईडो काळात मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. तथापि, सध्याच्या संरचना मूळ पायावर वसलेल्या नाहीत आणि मूळ इमारतींचे पुनर्बांधणी नाहीत. सध्याच्या मंदिराच्या इमारतींमध्ये याकुशी न्योराई आणि जोग्यो-डो ध्यानमंदिर असलेल्या होंडोचा समावेश आहे. ओइझुमी-गा-इके तलाव आणि आजूबाजूची जोडो(शुद्ध जमीन) बाग ८०० वर्षांपासून जतन केली गेली आहे. या बागेचा डिझायनर अज्ञात आहे, परंतु साकुतेकी (बागेच्या निर्मितीवर ११ व्या शतकातील ग्रंथ) स्पष्टपणे परिचित होता. बागेत दोन बेटांसह एक मोठा तलाव आहे.यातील आग्नेय किनाऱ्यावर एक द्वीपकल्प आणि दक्षिण किनाऱ्यावर तीन आहेत. तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर मूळ मुख्य सभामंडप, बेल टॉवर आणि सूत्र भांडाराचे अवशेष आहेत. मूळ बागेत, पुलांनी या हॉलला मध्य बेट आणि दक्षिणेचा मोठा दरवाजा जोडला होता. समुद्रकिनारा, द्वीपकल्प आणि खडबडीत पर्वत खडक असलेली किनारपट्टी समुद्रकिनाऱ्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. चेरीची झाडे, इरिसेस, कमळ, बुश क्लोव्हर आणि मॅपल्सची सुंदर लागवड आहेत. वर्षभर विविध उत्सव आयोजित केले जातात.
मोत्सु-जी हे निसर्गरम्य सौंदर्य असलेले एक खास ठिकाण आहे. एक विशेष राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ म्हणून नियुक्त केले आहे.[२]
वार्षिक कार्यक्रम
संपादन- २० जानेवारी: जोग्योदो २० वा नाईट फेस्टिव्हल आणि "एनेन नो माई" नृत्य
- १ ते ५ मे : स्प्रिंग फुजिवारा महोत्सव आणि एनेन नो माई डान्स
- २० जून - १० जुलै: अयामे मात्सुरी किंवा आयरिस उत्सव
- १६ ऑगस्ट: डायमोनजी मत्सुरी किंवा बॉन फायर फेस्टिव्हल
- १५ ते ३० सप्टेंबर: हागी मात्सुरी किंवा जपानी बुश क्लोव्हर फेस्टिव्हल
- १ ते ३ नोव्हेंबर: शरद ऋतूतील फुजिवारा महोत्सव आणि एनेन नो माई डान्स
हे सुद्धा पहा
संपादन- जपानच्या ऐतिहासिक स्थळांची यादी (इवाते)
- जपानमधील जागतिक वारसा स्थळे
- शिरामिझु अमिदाडो
संदर्भ
संपादन- ^ Yiengpruksawan, Mimi Hall (1998). Hiraizumi: Buddhist Art and Regional Politics in Twelfth-Century Japan. Harvard University Press. pp. 107–111. ISBN 0-674-39205-1.
- ^ "毛越寺庭園". Cultural Heritage Online (Japanese भाषेत). Agency for Cultural Affairs. 5 April 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादन- मोत्सुजी मंदिर (इंग्रजी संकेतस्थळ)
- जपान राष्ट्रीय पर्यटन संस्था
- हिराझुमी टुरिझम असोसिएशन