लिकी, मेरी : (६ फेब्रुवारी १९१३–९ डिसेंबर १९९६). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव मेरी डग्लस लिकी (मेरी डग्लस निकोल). त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे वडील एरस्काइन निकोल हे चित्रकार होते. वडील चित्रे काढण्यासाठी दरवर्षी फिरत असल्याने मेरी निकोल यांनी बालवयात खूप प्रवास केला. त्यांचे बरेचसे शिक्षण घरीच झाले. वडिलांप्रमाणेच मेरी उत्तम चित्रकार होत्या.

    फ्रान्समध्ये डॉर्डोन या सुप्रसिद्ध प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाजवळ राहत असताना त्यांना पुरातत्त्वविषयात गोडी निर्माण झाली. एरस्काइन निकोल यांचे १९२६ मध्ये फ्रान्समध्ये निधन झाल्यानंतर मेरी आणि तिची आई फ्रेरे सिसिलिया निकोल या इंग्लंडला परतल्या. यानंतर काही काळ मेरी यांनी केन्सिंगटनविंबल्डन येथे शालेय शिक्षण घेतले.वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. १९३०-३४ दरम्यान हेम्बुरी आणि डेव्हन येथील उत्खननांची रेखाटने करण्याचे काम त्यांनी केले. याच काळात त्या लंडनमध्ये भूविज्ञान आणि पुरातत्त्व या विषयांवरील व्याख्यानांना उपस्थित राहत असत. मानवशास्त्रज्ञ कॅन्टन-थॅामसन यांनी त्यांची केंब्रिज विद्यापीठातील पुरामानवशास्त्रज्ञ लुई लिकी (१९०३–१९७२) यांच्याकडे शिफारस केली. लुई लिकी यांच्या ॲडम्स ॲन्सेस्टर्स या पुस्तकासाठी चित्रे काढण्याचे काम त्या करू लागल्या.

मेरी लिकी यांना प्रामुख्याने प्रागैतिहासिक कला आणि पुरातत्त्वविषयांत रस असला, तरी त्या जीवाश्मांचा शोध आणि त्यांच्या अभ्यासात अग्रेसर होत्या. त्यांनी हायरॅक्स हिल, नजोलिकी पतिपत्नी केन्यात आले (१९३७). त्यानंतर पुढील तीन दशके दोघांनी पुरामानवशास्त्रात भरीव संशोधन केले. टांझानियात ओल्डुवायी गॅार्ज येथे ओएच-५ (झिंझ) जीवाश्माचा शोध (१९५९), ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या बरोबरीने अस्तित्वात असलेल्या होमो हॅबिलिस जीवाश्माचा शोध (१९६१), टांझानियातील लेटोली येथील उत्खननात ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्राण्यांच्या पाऊलखुणांचा शोध (१९७६) आणि इथिओपियातील हडार येथील सुप्रसिद्ध ल्युसीचा (एएल २८८-१) शोध (१९७८) हे मेरी लिकींच्या कामगिरीतील महत्त्वाचे टप्पे होते.रो रिव्हर केव्ह आणि ओलोर्गेसायली या स्थळांवर उत्खनन केले. लुई लिकी यांच्याप्रमाणेच कुतूहलापोटी त्या प्रागितिहासाकडे वळल्या होत्या आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यश संपादिले. तसेच टांझानियातल्या शैलचित्रांवर त्यांनी महत्त्वाचे काम केले (१९५१). हे संशोधन त्यांच्या आफ्रिकाज व्हॅनिशिंग आर्ट या पुस्तकात प्रकाशित झाले (१९८३).

मेरी लिकी यांना प्रामुख्याने प्रागैतिहासिक कला आणि पुरातत्त्वविषयांत रस असला, तरी त्या जीवाश्मांचा शोध आणि त्यांच्या अभ्यासात अग्रेसर होत्या. त्यांनी हायरॅक्स हिल, नजोरो रिव्हर केव्ह आणि ओलोर्गेसायली या स्थळांवर उत्खनन केले. लुई लिकी यांच्याप्रमाणेच कुतूहलापोटी त्या प्रागितिहासाकडे वळल्या होत्या आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यश संपादिले. तसेच टांझानियातल्या शैलचित्रांवर त्यांनी महत्त्वाचे काम केले (१९५१). हे संशोधन त्यांच्या आफ्रिकाज व्हॅनिशिंग आर्ट या पुस्तकात प्रकाशित झाले (१९८३).

मेरी लिकींनी प्रत्यक्ष शोधमोहिमांमधला सहभाग थांबवला (१९८३) आणि त्या ओल्डुवायी गॅार्ज येथून नैरोबीला आल्या. असे असले, तरी पुढील वीस वर्षे त्यांचे लेखन व संशोधन चालूच होते. ओल्डुवायी गॅार्ज : माय सर्च फॅार अर्ली मॅन (१९७९) आणि डिस्क्लोजिंग द पास्ट (१९८४) ही त्यांची प्रसिद्ध आत्मचरित्रे.

मेरी लिकींना जोनाथन (जन्म १९४०), रिचर्ड (जन्म १९४४) व फिलिप (जन्म १९४८) अशी तीन मुले. यांतील रिचर्ड लिकी यांनी मातापित्यांचा वारसा पुढे चालू ठेवत पुरामानवशास्त्रात मोलाचे योगदान दिले.

नैरोबी येथे मेरी लिकी यांचे निधन झाले.