विंबल्डन (इंग्लिश: Wimbledon) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन महानगरामधील एक जिल्हा आहे. विंबल्डन ग्रेटर लंडनच्या मर्टन ह्या बरोमध्ये वसले असून ते लंडन शहराच्या नैऋत्येस स्थित आहे. विंबल्डन येथील ऐतिहासिक वार्षिक विंबल्डन टेनिस स्पर्धांसाठी जगप्रसिद्ध आहे. विंबल्डन ही वर्षामधील चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक असून ती अनेकदा जगातील सर्वात प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा समजली जाते. ह्या स्पर्धेमुळे विंबल्डन हे नाव बहुतेक वेळा टेनिस स्पर्धेचा उल्लेख करण्याकरिताच वापरले जाते.

विंबल्डनमधील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रॉकेट क्लबचे मुख्य कोर्ट

बाह्य दुवे संपादन