मुस्लिम स्थापत्यशैली
पर्शियन,मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलींतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस " मुस्लिम स्थापत्यशैली " असे म्हणतात.ही शैली इसवी सन ११०० ते १३०० या काळात उदयास आली. या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (२४० फूट)मिनार आहे.मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू.इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू .दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लालकिल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत.वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.