मुग्धा चिटणीस (१८ फेब्रुवारी १९६५ - १० एप्रिल १९९६) ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री व कथाकथनकार होत्या. त्यांनी इ.स. १९८६ मध्ये 'माझं घर माझा संसार' या एकमेव चित्रपटात काम केले होते. ५ डिसेंबर १९९५ साली त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि १० एप्रिल १९९६ साली वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांचा मुंबई येथे राहत्या घरी मृत्यू झाला.[२]

मुग्धा चिटणीस
जन्म १८ फेब्रुवारी १९६५
मृत्यू १० एप्रिल, १९९६ (वय ३१)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९८६
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट माझं घर माझा संसार
वडील अशोक चिटणीस
आई शुभा चिटणीस
पती उमेश घोडके
अपत्ये इशा घोडके[१]

मुग्धा चिटणीसचा जन्म १८ फेब्रुवारी १९६५ साली अशोक चिटणीस आणि शुभा चिटणीस यांच्या पोटी झाला होता. चिटणीस यांनी भारतीय चित्रपट अभिनेते अजिंक्य देव सोबत इ.स. १९८६ मध्ये 'माझं घर माझा संसार' या एकमेव मराठी चित्रपटात काम केले होते.[३] तद्नंतर चिटणीस यांचे उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते. भारत आणि अमेरिकेत चिटणीस यांनी जवळपास ५०० पेक्षा जास्त कथाकथनचे कार्यक्रम सादर केले होते. भारतात ऑल इंडिया रेडिओ वर सुद्धा त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले होते.[४]

चिटणीस यांची मुलगी मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती तेव्हा त्यांचा कॅन्सर ने मृत्यू झाला होता. ईशाचा जन्म न्यू यॉर्क मध्ये झाला होता. आईच्या मृत्यू नंतर ईशा काहीकाळ आजोळी आपल्या आजी आजोबा सोबत राहिली होती. त्या नंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी मिळवली आहे.[४] अमेरिकन परराष्ट्रमंत्रालय आणि न्यू यॉर्क युनिव्हसिटी तर्फे मेरिटच्या आधारावर ईशाने आपल्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला. न्यूर्यॉक विद्यापीठासह जगभरात हुशार विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाची मानली गेलेली फुलब्राइट नावाची शिष्यवृत्ती सुद्धा ईशाने मिळविली आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "इशा घोडकेला अमेरिकेत मानाचे पद". महाराष्ट्र टाइम्स. Archived from the original on 2021-10-22. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "'माझं घर माझा संसार' सिनेमातील ही अभिनेत्री आठवतेय का?, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप". लोकमत. Archived from the original on 2021-10-22. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "अजिंक्य देवची ही गोड अभिनेत्री आठवतेय?, एकाच फिल्मनंतर झाली होती सिनेसृष्टीतून गायब". दिव्य मराठी. Archived from the original on 2017-06-14. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ a b ""माझं घर माझा संसार" सिनेमातील अभिनेत्रीबद्दल वाचून बसेल धक्का". झी न्युज. Archived from the original on 2018-06-18. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवा संपादन

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मुग्धा चिटणीस चे पान (इंग्लिश मजकूर)