बॉम्बे प्रांत

(मुंबई प्रेसिडेन्सी या पानावरून पुनर्निर्देशित)


बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency) हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती.

Bombay presidency
बॉम्बे प्रांत
ब्रिटिश भारताच्या प्रांत
ध्वज
चिन्ह

Bombay presidencyचे ब्रिटिश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Bombay presidencyचे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटिश भारत
स्थापना इ.स.१६१८
राजधानी मुंबई (बॉम्बे)
राजकीय भाषा मराठी, कन्नड, गुजराती, सिंधी, उर्दू, इंग्रजी, हिंदी.
क्षेत्रफळ ४,८८,८५० चौ. किमी (१,८८,७५० चौ. मैल)
लोकसंख्या २,५४,६८,२०९(१९०१)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

प्रशासन

संपादन

मुंबई प्रदेशाचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमलेला होता. त्यांची मुख्यालये कराची, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्या प्रमुख अधिकारी हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर असत. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे आठ तालुके असत आणि प्रत्येक तालुक्यात १००-२०० गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत, तलाठी आणि महार इ. कारभारी असत.

ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते. परत ३० मार्च १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत बाळ गंगाधर खेर हेच होते.

प्रशासकीय विभाग

संपादन
 
मुंबई इलाख्याचे मानचित्र

मुंबई प्रांताचे प्रशासकीय विभाग:- १. उत्तर किंवा गुजरात २. मध्य किंवा डेक्कन (दख्खन) ३. दक्षिण किंवा कर्नाटक ४. सिंध

मुंबई प्रांतातील जिल्हे:-

अ] गुजरात विभाग

संपादन

१. मुंबई शहर २. अहमदाबाद ३. भरूच ४. खेडा ५. पंच महाल ६. सुरत ७. ठाणे ८. कुलाबा ९. रत्‍नागिरी

आ] दख्खन विभाग

संपादन

१०. अहमदनगर ११. खान्देश (१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन) १२. नाशिक १३. पुणे १४. सातारा १५. सोलापूर

इ] कर्नाटक विभाग

संपादन

१६. बेळगाव १७. विजापूर १८. धारवाड १९. उत्तर कानडा

ई] सिंध विभाग

संपादन

२०. कराची २१. हैदराबाद २२. शिकारपूर २३. थर आणि पारकर २४. उत्तर सिंध सीमान्त

संस्थाने

संपादन

मुंबई इलाख्यातील संस्थाने -

अ] डेक्कन स्टेट एजन्सी - १. कोल्हापूर २. अक्कलकोट ३. औंध ४. जमखिंडी ५. जंजिरा ६. कुरुंदवाड (थोरले) ७. कुरुंदवाड (धाकटे) ८. मिरज (थोरले) ९. मिरज (धाकटे) १०. मुधोळ ११. फलटण १२. रामदुर्ग १३. सांगली १४. डफळापूर १५. जत १६. सावंतवाडी १७. सावनूर १८. भोर

समाजव्यवस्था

संपादन
 
मुंबईतील एलफिस्टन महाविद्यालय
 
मुंबईतील विक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस

मुंबई प्रांतात प्रामुख्याने सिंधी, मराठी, गुजराती आणि कन्नड या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या. मुंबई प्रदेशात एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण अधिक आहे. कानडी भागात बहुतांशी लिंगायत पंथाचे लोक होते. सिंधमध्ये सिंधी व मुसलमान आणि गुजरातमध्ये गुजराती व जैन समाजाचे लोक होते.

स्वातंत्र्योत्तर कालखंड

संपादन

भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली.

स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.

हे सुद्धा पहा

संपादन