मार्लन ब्रॅंडो, ज्युनियर (एप्रिल ३, इ.स. १९२४ - जुलै १, इ.स. २००४) हा ऑस्कर पारितोषिक विजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता होता.

मार्लन ब्रॅंडो
Marlon Brando in 'Streetcar named Desire' trailer.jpg
ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९५१) या चित्रपटात स्टॅन्ली कोवल्स्कीच्या भूमिकेत २७ वर्षांचा मार्लन ब्रॅंडो
पूर्ण नाव मार्लन ब्रॅंडो, जुनियर
जन्म ३ एप्रिल, १९२४ (1924-04-03) (वय: ९६)
ओमाहा, नेब्रास्का
मृत्यू १ जुलै, २००४ (वय ८०)
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
कारकीर्द काळ १९४४ - २००४
पत्नी नाव अ‍ॅना कश्फी (१९५७-१९५९)
मोविता कॅस्टानेडा (१९६०-१९६२)
टॅरिटा टेरिपिआ (१९६२-१९७२)
संकेतस्थळ http://www.marlonbrando.com/

पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपटांतून काम करणार्‍या ब्रॅंडोला इतिहासातील सगळ्यांत प्रभावी अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. त्याला ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायरऑन द वॉटरफ्रंट या चित्रपटांकरता प्रसिद्धी मिळाली. याशिवाय द गॉडफादर या चित्रपटातील व्हिटो कॉर्लियोनअपॉकॅलिप्स नाऊ या चित्रपटातील कर्नल वॉल्टर ई. कर्ट्झ या त्याच्या भूमिकांनाही दाद मिळाली. यातील पहिले दोन चित्रपट १९५० च्या दशकात एलिया कझानने तर दुसरे दोन चित्रपट १९७० च्या दशकात फ्रांसिस फोर्ड कोप्पोलाने दिग्दर्शित केले होते.