मार्था चेन
मार्था आल्टर चेन (९ फेब्रुवारी, १९४४ - ) या अमेरिकन समाजसेविका आहेत. यांनी भारत व दक्षिण आशियातील गरीब लोकांसाठी काम केले आहे.
अमेरिकेत जन्मलेल्या चेन यांचे पालक ख्रिश्चन मिशनरी होते व त्यासाठी ते भारतात येऊन राहिले. चेन यांचे शिक्षण मसूरी, देहरादून, लखनौ, कनेटिकट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथे झाले. त्या सध्या हार्वर्ड विद्यापीठात शिकवितात.
चेन यांचा भाऊ टॉम आल्टर भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे तर भाचा जेमी आल्टर क्रिकेट समालोचक आहे.