मारियो मोन्ती
मारियो मोन्ती (इटालियन: Mario Monti; मार्च १९, इ.स. १९४३) हा एक इटालियन अर्थतज्ञ, राजकारणी व इटलीचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये सिल्व्हियो बेर्लुस्कोनीने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोन्तींना ह्या पदावर नेमण्यात आले. २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत मोन्तीच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही व २८ एप्रिल २०१३ रोजी एन्रिको लेता हा इटलीचा नवा पंतप्रधान बनला.
मारियो मोन्ती Mario Monti | |
इटलीचे पंतप्रधान
| |
कार्यकाळ १६ नोव्हेंबर २०११ – २८ एप्रिल २०१३ | |
मागील | सिल्व्हियो बेर्लुस्कोनी |
---|---|
पुढील | एन्रिको लेता |
जन्म | १९ मार्च, १९४३ व्हारेसे, लोंबार्दिया, इटली |
गुरुकुल | येल विद्यापीठ |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत