एन्रिको लेता (इटालियन: Enrico Letta; २० ऑगस्ट १९६६) हा एक इटालियन राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. फेब्रुवारी २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे संसद दुभंगलेल्या अवस्थेत होती. अखेर राष्ट्राध्यक्ष ज्योर्जियो नापोलितानोने लेताच्या पक्षाला सिल्व्हियो बेर्लुस्कोनीच्या पक्षासोबत आघाडी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे लेता पंतप्रधानपदावर निवडून आला. परंतु सुमारे १० महिने सत्तेवर राहिल्यानंतर इटलीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात अपयश आल्यामुळे लेता ने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पार्तितो देमोक्रातिको ह्याच पक्षाचा अध्यक्ष मात्तेओ रेंत्सीची पंतप्रधानपदी नियुक्ती केली गेली.

एन्रिको लेता
Enrico Letta
Enrico Letta 2013.jpg

इटलीचा पंतप्रधान
कार्यकाळ
२८ एप्रिल २०१३ – २२ फेब्रुवारी २०१४
राष्ट्रपती ज्योर्जियो नापोलितानो
मागील मारियो मोन्ती
पुढील मात्तेओ रेंत्सी

जन्म २० ऑगस्ट, १९६६ (1966-08-20) (वय: ५६)
पिसा, तोस्काना, इटली
राजकीय पक्ष पार्तितो देमोक्रातिको

बाह्य दुवेसंपादन करा