माधोस्वरूप वत्स हे एक पुरातत्त्वज्ञ होते. १ जुलै, इ.स. १९५० ते २ मार्च, इ.स. १९५३ पर्यंत ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे महानिदेशक होते. त्यांच्या जन्माविषयी तसेच बालपणाविषयी माहिती उपलब्ध नाही.[१] हडप्पा येथील उत्खननात इ.स. १९२०-२१ आणि इ.स. १९३३-३४ मध्ये त्यांनी भाग घेतला. एपिग्राफिया इंडिका या नियतकालिेकातून त्यांनी कार्ले लेण्यातील ब्राह्मी लेख व इतर ताम्रपट व शिलालेखांचे वाचन प्रसिद्ध केले. भारतीय मंदिर वास्तुशैलींचा व ब्राह्मी लिपीचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ शोभना गोखले. "वत्स, माधोस्वरूप". ४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.