महाराष्ट्रातील मासेमार जनजाती
महाराष्ट्रात अनेक मासेमार जनजाती आहेत. या जनजाती पारंपारिकरीत्या गोदावरी, नर्मदा, कृष्णा इत्यादी मोठ्या नद्या आणि अरबी समुद्राच्या जवळ वस्ती करून आहेत.
धिवर
संपादनधिवर ही मासेमारांची एक महत्त्वाची जनजात प्रामुख्याने महराष्ट्राच्या पूर्व भागात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, राजस्थान, गुजरात मध्ये वास्तव्यास असून त्यांचा प्रमुख व्यवसाय गोड्या पाण्यातील मासेमारी आहे. संस्कृत धीवर ह्या शब्दापासुन ह्या जनजातीचे संबोधन घेण्यात आले असून ज्याचा शाब्दिक अर्थ मासेमार असा होतो. मासेमारी सोबतच हे लोक फुटाने (भाजलेले हरभरे), सिंघाडे सुद्धा विकतात. नदी या भौगोलिक घटकांशी एक प्रकारचे जिव्हाळ्याचे संबंध स्थापीत करून ही जन जात जगते आहे. नदीच्या कडेने अनेक अधिवासांना यांनी धार्मिक महत्त्व देउन त्यांत मासेमारी करण्याला बंदी केलेली असते. महाराष्ट्राच्या पुर्व भागात (विदर्भ) वसलेले लोक मराठी हीच भाषा बोलतात पण मध्यप्रदेशात (मंडला, सिवनी इत्यादी भागात) असणारे धिवर (धिमर) हे प्रामुख्याने हिंदी भाषा बोलतात.धिवरांमध्ये उपजीवीकेच्या साधनानुसार बरेच विभाग आहेत उदा. सिंघाडीय़ा हे सिंगाड्यांची (पाण्यात निर्माण होणारा एक प्रकारचा खाद्य उपयोगी कंद) पैदास करताततर नधा" हे नदीच्या कडेने राहुन प्रामुख्याने मासेमारी करतात आणि घुरीया हे फुटाने विकतात[१]. मासेमारी सोबतच हे लोक विविध प्रकारचे व्यवसाय करतात उदा. नदीच्या पात्रात टरबुज किंवा भाजीपाल्याचे उत्पादन घेने, शेती करणे इत्यादी. परंतु शेतीच्या बाबतीत हे लोक जास्त निश्नात नसतात. धिवरांची भारतातील लोकसंख्या 1,653,000 असल्याचा अंदाज असून खालील तक्त्यात दिलेल्या माहिती प्रमाणे भारतातल्या विविध राज्यात त्यांची लोकसंख्या विखुरलेली आहे.
मध्य प्रदेश : 872,000 महाराष्ट्र : 449,000 छत्तीस गढ : 175,000 ओरीसा : 144,000 राजस्थान: 3,700 गुजरात: 1,500 दिल्ली: 200 दादरा आणि नगर हवेली: 50 दमन दिव : 40
भोई
संपादनमासेमारी करणाऱ्या जनजातीं मध्ये भोई सुद्धा एक महत्त्वाची जनजात आहे. एका अंदाजा नुसार यांची भारतातील संख्या 5,568,000आहे भोई ही आदिवासी जमात होती परंतु १९४७ नंतर भट्क्या जमाती
केवट
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Singh K.S. (Ed.). 2004. People of India. Maharashtra. Anthropological Survey of India. Popular Prakashan Pvt. Ltd. Mumbai. Part 1 Vol. XXX. Pp 785
- http://www.joshuaproject.net/peopctry.php?rog3=IN&rop3=111940
- Singh K.S. (Ed.). 2004. People of India. Maharashtra. Anthropological Survey of India. Popular Prakashan Pvt. Ltd. Mumbai. Part 1 Vol. XXX. Pp 785