दुसरा मेहमेद

(महमद दुसरा ऑट्टोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरा मेहमेद (३० मार्च १४३२ – ३ मे १४८१) (ओस्मानी तुर्की: محمد ثانى; तुर्की: II. Mehmet) हा इ.स. १४४४ ते १४४६ व १४५१ ते १४८१ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. १४३२ साली एदिर्ने येथे जन्मलेल्या दुसऱ्या मेहमेदने वयाच्या २१व्या वर्षी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून तेथे ओस्मानी सत्ता प्रस्थापित केली. ह्या घटनेमुळे बायझेंटाईन साम्राज्याचा अस्त झाला व युरोपात ओस्मान्यांना प्रवेश मिळाला.

दुसरा मेहमेद
मेहमेदची राजकीय मुद्रा (तुग्रा)

आपल्या कार्यकाळात ओस्मानी साम्राज्याला बलाढ्य करण्याचे श्रेय मेहमेदला दिले जाते. तुर्कस्तानच्या इतिहासामध्ये दुसऱ्या मेहमेदला मानाचे स्थान असून येथील फातिह सुलतान मेहमेद पूलाला त्याचेच नाव दिले गेले आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: