ओस्मानी तुर्की भाषा
ओस्मानी तुर्की (لسان عثمانى Lisân-ı Osmânî ) ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा ओस्मानी साम्राज्याची राजकीय भाषा होती. अरबी व फारसी भाषांचा मोठा प्रभाव असलेली ही भाषा वाचणे व समजणे साधारण तुर्की जनतेला अवघड जात असे.
१९२८ साली ओस्मानी साम्रायाचा पाडाव झाल्यानंतर मुस्तफा कमाल अतातुर्कने ओस्मानी तुर्की भाषेचा वापर बंद करून नवनिर्मित तुर्की देशात तुर्की भाषा अंमलात आणली.