मळवली
मळवली हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव पुण्यापासून ५९ कि.मी., तर मुंबईपासून ५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे पुणे उपनगरीय रेल्वेचे स्थानक आहे. मळवली परिसरात भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी, तसेच मराठा साम्राज्याचा इतिहासात उल्लेख असलेले लोहगड व विसापूर हे किल्ले प्रसिद्ध आहेत.
राजा रविवर्माने येथे आपली चित्रशाळा उभारली होती.