मलनाड गिड्डा गाय
मलनाड गिड्डा किंवा मलेनाडू गिड्डा (कन्नड:ಮಲೆನಾಡು ಗಿಡ್ಡ) हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः कर्नाटकच्या पहाडी भागात आढळतो. या गोवंशाचा उगम शिमोगा या उत्तर कर्नाटक प्रांतातील आहे असे मानले जाते.[१]
शारीरिक रचना
संपादनकर्नाटकातील मलनाड या पश्चिमी पर्वतीय क्षेत्रावरून मलनाड गिड्डा असे याचे नाव पडले. अर्थात डोंगराळ प्रदेशात राहणारा बुटका गोवंश. कन्नड भाषेत या गोवंशाला उरदना (ಊರದನ) आणि वर्षगंधी (ವರ್ಷಗಂಧಿ) असे पण म्हणले जाते.[२] हा गोवंश उंचीला बुटका असून, शरीराने मजबूत आणि काटक असतो. रंग गडद काळपट लाल ते तपकिरी असून क्वचितच अंगावर पांढरे डाग असतात. शिंग लहान असून पाठीमागे बाहेर वळलेले असते. तसा हा गोवंश जरा जास्तच शांत किंवा लाजाळू मानला जातो.[३][४][५]. एकेकाळी या गोवंशाचे अस्तित्त्व धोक्यात आले होते, परंतु संरक्षण आणि संगोपन झाल्यामुळे आता हा धोक्याच्या पातळीबाहेर पडला.[३]
वैशिष्ट्य
संपादनफार पूर्वीपासून मलनाड गिड्डा या गोवंशाचे दूध आणि मूत्र (गोमूत्र) औषधी गुणधर्माचे मानले जात आले आहे.[६]
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[७] .
भारतीय गायीच्या इतर प्रजाती
संपादनभारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ About Malnad Gidda Cattle
- ^ a b "Malnad Gidda gets breed status" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Malnad Gidda - Indian Council of Agricultural Research" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Malenadu Gidda - Vishwagou" (इंग्रजी भाषेत). 6 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ Need for conserving Malnad Gidda dwarf cattle breed - The Hindu
- ^ "Breeds । nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०२१ रोजी पाहिले.