एम.एच.पी.अरेना

स्टटगार्टमधील फुटबॉल स्टेडियम
(मर्सेडिझ-बेंझ अरेना या पानावरून पुनर्निर्देशित)

एम.एच.पी.अरेना (जर्मन: MHPArena) हे जर्मनी देशाच्या श्टुटगार्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. इ.स. १९९३ पर्यंत हे स्टेडियम नेकरस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. १९९० च्या दशकामध्ये ह्या स्टेडियमच्या पुनर्बांधणी व सुधारासाठी डाइमलर-बेन्झ कंपनीने निधी पुरवल्यामुळे गोटलिब डाइमलरचे नाव ह्याला दिले गेले. २००८ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून मर्सिडिझ-बेन्झ अरेना हे ठेवण्यात आले. २०२३ साली ह्या स्टेडियमचे नाव बदलून सध्याचे एम.एच.पी.अरेना हे ठेवण्यात आले.

एम.एच.पी.अरेना
मागील नावे मर्सिडिझ-बेन्झ अरेना, गॉट्ट्लीब-डाइमलर-स्टेडियोन , नेकरस्टेडियोन
स्थान श्टुटगार्ट, जर्मनी
उद्घाटन २३ जुलै १९३३
पुनर्बांधणी १९५१, २००३, २००५
बांधकाम खर्च ६.३५ कोटी युरो
आसन क्षमता ६०,४४१
वापरकर्ते संघ/स्पर्धा
फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट (१९९३ ते चालू)

आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८८ स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९५९ व १९८८ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

संपादन

१९७४ फिफा विश्वचषक

संपादन

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१५ जून १९७४   पोलंड 3-2   आर्जेन्टिना पहिली फेरी 31,500
१९ जून १९७४   आर्जेन्टिना 1-1   इटली पहिली फेरी 68,900
२३ जून १९७४   पोलंड 2-1   इटली पहिली फेरी 68,900
२६ जून १९७४   स्वीडन 0-1   पोलंड दुसरी फेरी 43,755

युएफा यूरो १९८८

संपादन
तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१२ जून १९८८   इंग्लंड 0-1   आयर्लंडचे प्रजासत्ताक पहिली फेरी 51,573
२२ जून १९८८   सोव्हियेत संघ 2-0   इटली उपांत्य-फेरी 61,606

२००६ फिफा विश्वचषक

संपादन

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१३ जून २००६   फ्रान्स 0-0   स्वित्झर्लंड गट ग 52,000
१६ जून २००६   नेदरलँड्स 2-1   कोत द'ईवोआर गट क 52,000
१९ जून २००६   स्पेन 3-1   ट्युनिसिया गट ह 52,000
२२ जून २००६   क्रोएशिया 2-2   ऑस्ट्रेलिया गट फ 52,000
२५ जून २००६   इंग्लंड 1-0   इक्वेडोर १६ संघांची फेरी 52,000
८ जुलै २००६   जर्मनी 3-1   पोर्तुगाल तिसऱ्या स्थानाचा सामना 52,000


बाह्य दुवे

संपादन
स्टेडियमचे विस्तृत चित्र