मराठी पुस्तके (संकेतस्थळ)

मराठी पुस्तके डॉट ऑर्ग हे मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा याकरिता पुढाकार घेतलेले संकेतस्थळ आहे. येथे असलेली मराठी पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध असतात. निर्मितीत सहभाग करून एखाद्या ई-पुस्तकाची निर्मिती करणे हे या चळवळीतले मुख्य कार्य आहे. या स्थळावर पुस्तकांचा शोध घेता येतो, आणि पुस्तके उतरवूनही घेता येतात..

योजना

संपादन

मराठी पुस्तके डॉट ऑर्ग या स्थळाने अनेक योजना आखल्या आहेत. त्या अंतर्गत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, राजवाडे, ह. ना. आपटे अशा लेखकांचे साहित्य मराठीतून उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

प्रताधिकार

संपादन

येथे असलेली पुस्तके प्रामुख्याने प्रताधिकारमुक्त किंवा प्रताधिकारविरहित असतात. मराठीत अभिजात तरीही दुर्मिळ आणि प्रताधिकारमुक्त असे भरपूर साहित्य आहे. ते वाचकांना फारसे उपलब्ध नाही. काही नावाजलेली वाचनालये सोडल्यास, वाचण्यासाठी हे साहित्य जवळपास उपलब्ध नाही. या चळवळीच्या माध्यमातून या साहित्याची जागतिक उपलब्धता वाढेल.

निर्मिती सुरू असलेली पुस्तके

संपादन
  • समग्र केशवसुत : कवी - केशवसुत
  • समग्र फुले वाङ्मय : लेखक - महात्मा जोतिबा फुले
  • समग्र बालकवी : कवी - बालकवी
  • यमुनापर्यटन : लेखक - बाबा पदमजी

तयार असलेली पुस्तके

संपादन

संत साहित्य

संपादन
  • मनाचे श्लोक  : कवी - संत रामदास
  • तुकाराम गाथा
  • दासबोध
  • ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका

[ संदर्भ हवा ]=== ऐतिहासिक ===

  • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास : लेखक - वि.का.राजवाडे
  • सभासद बखर
  • स्त्री-पुरुष तुलना : लेखिका : ताराबाई शिंदे

ज्ञानेश्वरांवर इतर लेखकानी केलेले लेखन व संदर्भ सूची

कविता

संपादन
  • केशवसुतांच्या काही कविता
  • महात्मा फुलेंच्या काही कविता
  • बालकवींच्या काही कविता
  • महाराष्ट्रगीत : कवी - कोल्हटकर

नाटके

संपादन
  • राजसंन्यास : लेखक राम गणेश गडकरी
  • संगीत शाकुंतल : लेखक - अण्णासाहेब किर्लोस्कर
  • संगीत शारदा : लेखक - गोविंद बल्लाळ देवल
  • गावगाडा : लेखक - त्रिंबक नारायण आत्रे
  • म्हणींचा कोश
  • हृदय

मराठी पुस्तकांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या काही प्रकाशन संस्थांची/विक्रेत्यांची संकेतस्थळे

संपादन

मराठी पुस्तकांची ऑनलाइन विक्री न करणाऱ्या काही प्रकाशन संस्थांची/विक्रेत्यांची संकेतस्थळे

संपादन
  • अक्षर प्रकाशन
  • मॅजेस्टिक प्रकाशन
  • मी मराठी शॉप
  • राजहंस प्रकाशन
  • रोहन प्रकाशन
  • लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन
  • सह्याद्री बुक्स
  • साहित्य संपदा
  • ई सहित्य प्रतिष्ठान
  • परिसस्पर्श पब्लिकेशन

संकेतस्थळ नसलेल्या प्रकाशन संस्था

संपादन

बाह्य दुवे

संपादन