या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


राजहंस प्रकाशन या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग. माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. त्यानंतर दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.

मोठे पुस्तकप्रकल्प, एकाच पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या, कमीत कमी दिवसांत मोठी विक्री होण्याचे विक्रम असे सगळे ‘राजहंस’च्या नावाशी जोडलेले आहे. ‘राजहंस’चे मुख्य कार्यालय पुण्याच्या सदाशिव पेठेत आहे, पण त्यांची विस्तार कार्यालये महाराष्ट्रभर पसरली आहेत. विक्रीचे असे भक्कम जाळे उभे करताना पुस्तकांचा दर्जा टिकवण्याकडेही संस्थेचा कल आहे. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘राजहंस’च्या पुस्तकांना मिळाले आहेत, त्यांपैकी शंभराहून अधिक पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून मिळालेले आहेत..

राजहंसने प्रकाशित केलेली आणि गाजलेली काही पुस्तके

संपादन

’आकाशाशी जडले नाते’ (डॉ.जयंत नारळीकर), ’एक होता कार्व्हर’ (वीणा गव्हाणकर) ,’एका रानवेड्याची शोधयात्रा’ (कृष्णमेघ कुंटे), ऐसपैस गप्पा दुगाबाईंशी’ (प्रतिभा रानडे), ‘जगाच्या पाठीवर’ (सुधीर फडके), ’झाडाझडती’ (विश्वास पाटील), ’दीपस्तंभ’ ए.पी.जे. अब्दुल कलाम, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ (वि.ग. कानिटकर), ’नातिचरामि‘ (मेघना पेठे), ’पानिपत’ (विश्वास पाटील), ’बोक्या सातबंडे’ (दिलीप प्रभावळकर), ’बोलु कवतिके’ (अविनाश बिनीवाले), ’ब्र’ (कविता महाजन), ’महानायक (विश्वास पाटील), ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’ (डॉ.अभय बंग), ‘राजा शिवछत्रपती’ (बाबासाहेब पुरंदरे), लक्ष्मणरेषा’ (आर.के. लक्ष्मण), ‘सांगत्ये ऐका’ (हंसा वाडकर), वगैरे.

राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले गैरसरकारी पुरस्कार आणि पुरस्कारप्राप्त पुस्तकांची नावे

संपादन
 • ‘महानायक’ला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार (१९९९)
 • इचलकरंजी एज्युकेशनल ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार : सावरकर ते भा.ज.प. - हिंदुत्व विचारांचा चिकित्सक आलेख (१९९२-९३); सावरकरांचे राजकारण-सत्य आणि विपर्यास(१९९२-९३); हंस अकेला(१९९७-९८); रामायण महाभारतातील आत्महत्या (२००४-०५) या पुस्तकांना.
 • ‘शोकात्म विश्वरूप दर्शन’ला केशव भिकाजी ढवळे पुरस्कार (२०००)
 • केसरी मराठा संस्था व शिवाजी मंदिर संस्था याच्यातर्फे न.चिं केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक : देवगंधर्व (१९९२-९३); हसरे दुःख (१९९२-९३); आकाशाशी जडले नाते (१९९८) या पुस्तकांना.
 • गोविंदराव सावंत स्मृति साहित्य संजीवन पुरस्कार (१९९६-९७) : काश्मीर -एक शापित नंदनवन; मध्ययुगीन मराठी साहित्य-एक पुनर्विचार या पुस्तकांना.
 • ‘एक 'इझम'...निरागस’ला दहिवळ गुरुजी प्रतिष्ठानचा 'दहिवळ गुरुजी स्मृती साहित्य पुरस्कार' (इ.स. २००९)
 • दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (नवी दिल्ली)चे ग्रंथनिर्मिती पुरस्कार : अमृतसिद्धी-पु.ल. समग्रदर्शन; गणित ज्ञानकोश(दोन्ही १९९५); एक झुंज शर्थीची; राजहंस ग्रंथवेध २०११; संस्कृतीरंग (तिन्ही २०१२)
 • दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (नवी दिल्ली)चे उत्कृष्ट सूचीचे दुसरे पारितोषिक (१९९७) : सत्तावन ते सत्तेचाळीस या पुस्तकाच्या रंगीत माहितीपत्रकास
 • दि.बा. मोकाशी पुरस्कार : बंदिश(१९९६); विदेश(१९९९)
 • पंडित नेहरू ग्रामीण ललितकला अकादमी प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार(१९९२-९३) : झाडाझडती
 • पानघंटी पुरस्कार(१९९६) : ओॲसिसच्या शोधात
 • पुणे नगर वाचन मंदिराचा श्री.ज. जोशी पुरस्कार(१९९२) : झाडाझडती
 • पुणे मराठी ग्रंथालय यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर पारितोषिक(१९९७-९८) : सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार
 • प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार : पानिपत(१९८९); हंस अकेला(१९९८)
 • नांदेडच्या ‘बन ग्रंथगौरव’चा पुरस्कार : तमाशा-विठाबाईच्या आयुष्याचा
 • भारतीय भाषा परिषद (कलकत्ता) यांचा १९९२ सालचा पुरस्कार (१९९२) : पानिपत
 • भारतीय समाज विज्ञान मंडळाचा वैचारिक ग्रंथ पुरस्कार : डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण(१९९९)
 • भैरू रतन दमाणी पुरस्कार(सोलापूर) (१९९६) : ओॲसिसच्या शोधात
 • मॅजेस्टिकचा केशवराव कोठावळे पुरस्कार : जाळ्यातील चंद्र (१९९५); सावरकरांचे राजकारण-सत्य आणि विपर्यास(१९९३)
 • मथुराबाई सार्बजनिक वाचनालयाचा महात्मा फुले साहित्य व वाङ्‌मय पुरस्कार (१९९१-९१) : झाडाझडती
 • महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार (पुणे) (१९९७) : सिकंदर
 • महाराष्ट्र टाइम्सने निवडलेल्या दशकातील उत्कृष्ट पन्नास पुस्तकांतील एक (१९९७) : पानिपत
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथासंग्रहासाठीचे आनदीबाई शिर्के पारितोषिक : हंस अकेला
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठा नी.स. गोखले पुरस्कार(१९९८) : आकाशाशी जडले नाते
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे द.वा. पोतदार पुरस्कार(१९८९-९०) : जंग-ए-काश्मीर; एल्फिन्स्टन; सावरकर ते भा.ज.प. - हिंदुत्व विचारांचा चिकित्सक आलेख
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार(१९९६) : काश्मीर-एक शापित नंदनवन; महाभारताचे वरदान
 • महाराष्ट्र्त साहित्य परिषदेचा रा.श्री. जोग पुरस्कार : शोकात्म विश्वरूप दर्शन(१९९९-२०००)
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वामन मल्हार जोशी पारितोषिक(१९९२-९३) : झाडाझडती; पानिपत
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार(१९९७) : वळणावरचे साकव
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शं.ना. जोशी परितोषिक : इन्किलाब विरुद्ध जिहाद
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ह.ना. आपटे पारितोषिक(१९९६) : कादंबरी-एक
 • मारवाडी संमेलन-घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार : झाडाझडती(१९९२-९३); डॉ.खानखोजे-नाही चिरा नाही पणती(१९९८)
 • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वि.ह. कुलकर्णी पुरस्कार : योद्धा संन्यासी(१९९१-९२)
 • मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा १९९४-९५-९६चा उत्कृष्ट प्रवासवर्णनविषयक पुस्तकासाठीचा पुरस्कार : ओॲसिसच्या शोधात (१९९७)
 • मुंबई मराठी साहित्य संघाचा वि.पु. भागवत पुरस्कार(१९९१) : राजहंस प्रकाशन संस्था
 • रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वि.का. राजवाडे स्मृति पुरस्कार(१९९८) स्वामी दरियाचे
 • रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार(१९९२) : झाडाझडती
 • वि.स.खांडेकर प्रतिष्ठानचा वैचारिक लेखनासाठीचा पुरस्कार(१९९४-९५) : जाळ्यातील चंद्र
 • श्री.दा. पानवलकर स्मृति पुरस्कार(१९९८) : हंस अकेला
 • संत नामदेव पुरस्कार (जामखेड)(१९९६) : ओॲसिसच्या शोधात
 • स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे विज्ञानमित्र ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार : आकाशाशी जडले नाते(१९९९)
 • स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे समीक्षा ग्रंथासाठीचा द.दि. पुंडे पुरस्कार : शोकात्म विश्वरूप दर्शन(२०००)

राजहंस प्रकाशनाचे सध्याचे अन्य संपादक

संपादन

आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे

(अपूर्ण)

प्रकाशनसंस्थेचा पत्ता

संपादन

राजहंस प्रकाशन
१०२५, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०
फोन - +९१ २० २४४७३४५९

ई-पत्ताः
rajhans1@pn2.vsnl.net.in

संकेतस्थळ :
http://www.rajhansprakashan.com