ममता कुलकर्णी

मराठी चित्रपट अभिनेत्री

ममता कुलकर्णी (एप्रिल २०, इ.स. १९७२ - हयात) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भूतपूर्व मराठी अभिनेत्री आहे. मिथिला आणि मोलिना या तिच्या बहिणी. सन १९९३मध्ये ममताचे स्टाररडस्ट या नियतकालिकात अर्ध‍अनावृत्त छायाचित्र प्रकाशित झाल्याने ती अचानक प्रकाशात आली. असे असले तरी तिने इ.स. २००२पासून चित्रपटांत काम केलेले नाही. चित्रपटांतील तिच्या भूमिका बहुधा कामुक स्वरूपाच्या असत. ती विकी गोस्वामी या माणसाबरोबर आधी दुबईला आणि नंतर केन्याला गेली.

ममता कुलकर्णी
जन्म एप्रिल २०, इ.स. १९७२
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
भाषा मराठी
हिंदी
प्रमुख चित्रपट करण अर्जुन
वडील मुकुंद कुलकर्णी

सध्या ती आपल्या जोडीदाराबरोबर केन्यामध्ये राहते. विजयगिरी आनंदगिरी गोस्वामी उर्फ विकी गोस्‍वामी हे तिच्या जोडीदाराचे नाव. हा माणूस एक कुप्रसिद्ध ड्रग माफिया आहे. त्याचे दुबईमध्ये एक हॉटेल आहे. १४ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याला केन्या पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले आहे. विकीबरोबरच पोलिसांनी केन्याचा की ड्रग माफिया बराकत आकाशा, त्याचा भाऊ आणि पाकिस्तानी ड्रग तस्कर गुलाम हुसैन यांनाही पकडले आहे. ही अटक आंतरराष्ट्रीय तस्कर आणि दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या सांगण्यावरून झाली असे समजले जाते. ममता कुलकर्णीला ९ नोव्हेंबर २०१४लाच ताब्यात घेतले होते, पण चौकशीनंतर सोडून दिले.

ममता कुलकर्णीचे आत्मचरित्र

संपादन
  • Autobiography Of An Yogini by Mamta Kulkarni : Man From Mountains "Shree Gagangiri Maharaj', who raised dead

उल्लेखनीय

संपादन

कार्य

संपादन

चित्रपट

संपादन

भूमिका केलेल्या हिंदी व अन्य चित्रपटांची नावे

संपादन
  • अनोखा प्रेमयुद्ध
  • अशांत
  • अहंकार
  • आंदोलन
  • आशिक आवारा
  • कभी तुम कभी हम
  • करण अर्जुन
  • किला
  • किस्मत (नवा)
  • क्रांतिवीर
  • गॅंगस्टर
  • घटक
  • घातक
  • चंदामामा (मल्याळी)
  • चायना गेट
  • छुपा रुस्तम
  • जाने जिगर
  • जीवनयुद्ध
  • डिव्हाइन टेम्पल खजुराहो
  • डोंगा पोलीस (तेलुगू)
  • तिरंगा
  • दिलबर
  • नसीब
  • नानबर्गल (तामीळ)
  • पोलीसवाला गुंडा
  • प्रेमशिखरम (तेलुगू)
  • बाजी (नवा)
  • बेकाबू
  • बेताब बादशाह
  • भूकंप
  • मेरा दिल तेरे लिये
  • राजा और रंगीली
  • वक्त हमारा है
  • वंशाधार (बंगाली)
  • वादे इरादे
  • सबसे बडा खिलाडी
  • सेन्सॉर

चित्रपट अधिक माहिती

संपादन


वर्ष नाव भूमिका इतर माहिती
२००२ कभी तुम कभी हम
२००२ डिव्हाइन टेम्पल खजुराहो
२००१ छुपा रुस्तम: अ म्युझिकल थ्रिलर Sandhya
२००१ सेन्सोर Nisha (Censor Board Member)
१९९८ किला Neeta
१९९८ जाने जिगर Meenu
१९९८ चायना गेट Sandhya Rajan
१९९७ क्रांतिकारी
१९९७ जीवन युध Kajal Choudhry
१९९७ Naseeb Pooja
१९९६ Ghatak: Lethal Dancer in song Maara Re
१९९६ Beqabu Reshmi Kapoor
१९९६ Raja Aur Rangeeli
१९९५ Sabse Bada Khiladi Sunita Das
१९९५ Baazi Sanjana Roy, Journalist
१९९५ Ahankaar Naina
१९९५ Andolan Guddi
१९९५ Karan Arjun Bindiya
१९९५ Kismat
१९९५ Policewala Gunda
१९९४ Vaade Iraade Nikita Sekhri
१९९४ Dilbar Priya Verma
१९९४ Gangster
१९९४ Betaaj Badshah Tejeshwani/Guddiya
१९९४ Anokha Premyudh Priti
१९९४ Krantiveer Mamta
१९९३ Waqt Hamara Hai Mamta Vidrohi
१९९३ Bhookamp
१९९३ Aashiq Awara Jyoti (Won Filmfare Lux Award of the year)
१९९३ Ashaant Sonali Vishnu Vijaya India: Kannada title: dubbed version
१९९२ Mera Dil Tere Liye Priya R Singh
१९९२ Tirangaa

बंगाली

संपादन
  • Bangshadhar (Ronit Roy and Mamta) (2001)

मलयालम

संपादन
  • Chandamama (1999) - Guest appearance in the song "Roja Poo Kavilatthu"
  • Nanbargal (1991)

तेलुगू

संपादन
  • डोंगा पोलीस (1992)
  • प्रेमशिखरम (1992)

संदर्भ

संपादन
  1. "Mamta Kulkarni". IMDB. Retrieved 7 April 2011.
  2. "The predator as prey". Rediff India. 1997-12-27. Retrieved 2006-07-10.
  3. "J’accuse!". The Telegraph. 2005-03-04. Retrieved 2006-07-10.
  4. Once Bollywood 'Hot'Shots: Where Are They? - Features-Features & Events-Indiatimes - Movies
  5. "Eyecatchers". India Today. 2000-08-14. Retrieved 2006-07-10.
  6. Jha, Sachchidanand (1997-03-21). "Mamta grilled in fodder scam case". The Times of India. Retrieved 2006-07-10.[dead link]
  7. Mohamed, Khalid (19 August 2006). "Gone with the wind". Daily News and Analysis. Retrieved 2011-06-06.

बाह्य दुवे

संपादन