मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस

मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या जबलपूर रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. पश्चिम मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसला जबलपूर ते दिल्ली दरम्यानचे ९०९ किमी अंतर पार करायला १४ तास लागतात.

मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसचा फलक
मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसचा मार्ग

तपशील संपादन

वेळापत्रक संपादन

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२१२१ जबलपूर – हजरत निजामुद्दीन १९:१० ०९:०५ रवि, बुध, शुक्र
१२१२२ हजरत निजामुद्दीन – जबलपूर १७:२५ ०७:४५ सोम, गुरू, शनी

मार्ग संपादन

स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
JBP जबलपूर रेल्वे 0
KTE कटनी 91
DMO दामोह 202
SGO सागर 280
JHS झाशी 507
GWL ग्वाल्हेर 604
NZM हजरत निजामुद्दीन 909

बाह्य दुवे संपादन