पृष्ठवंशीय प्राण्यांच्या पाठीच्या कणास्तंभातील प्रत्येक हाडाला मणका म्हणतात. हे हाड एक जटिल संरचना आणि काही काचेसारख्या कूर्चापासून बनलेले आहे. मणक्याचे स्वरूप प्राण्याच्या प्रजाती व पाठीच्या क्षेत्रानुसार बदलते. एका मणक्याच्या हाडात अनेक जटिल संरचना आहेत. सर्व मणक्यांच्या एकत्रित माळेला कणा असे म्हणतात. मणक्यांच्या एकमेकात अडकणारी रचना प्राण्याच्या पाठीला शक्ती आणि लवचीकता देते.

मणके - रचना

मणक्याचा आकार तो पाठीच्या कण्यात कोठे आहे यावर ठरतो.. सहपृष्ठवंशीय प्रजातींमध्ये मणक्यांचे प्रकार बरेचसे एकसारखे असतात.