कूर्चा ही दोन हाडांच्या किंवा सांध्यांच्या मध्ये असलेली एक गादी (ऊती) होय. याला कास्थी असेही म्हणतात. ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी संयोजी ऊती आहे. हे भाग अत्यंत मऊ अशा रेषामय आवरणाने बनलेले असतात. काननाक यांचा काही भाग कूर्चेचा बनलेला असतो. या कूर्चा सांध्यांना सोयीस्कर बनवण्यासाठी हलविण्यासाठी मदत करते. ही हाडांचे रक्षण करते. ही बहुदा चेतारज्जू यांना जोडलेली असते. गुडघा याच्या वाटीवरील कूर्चा झिजल्यास अतिशय त्रास होतो. तसेच मानेतील कूर्चा झिजल्यास स्पॉंडिलायटिस नावाचा विकार होतो. कूर्चेचे नुकसान झाल्यास हाडे एकमेकांवर घासून संधिवाताचा त्रास होतो. त्यांची झीज भरून येण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. यांची झीज अतिशय हळू भरून येते. म्हणून यांच्याशी संबंधित विकार दीर्घ असतात. कूर्चा रोपण करता येते परंतु हे अतिशय जटील क्रिया आहे. कूर्चा ही घनरूप गर्भ वाढत असताना मेझोडर्मपासून निर्मित संयोजक पेशीजाल मेदयुक्त पासून स्थापना करण्याची प्रक्रिया आहे. कुर्चांमध्ये रक्तप्रवाह त्वचेच्या मानाने थोडा कमी असल्यानं किंवा नसल्याने हे भाग थंडीमुळे लगेच गार पडतात. म्हणून आपले कान व नाक गार पडते. कूर्चा क्ष किरण शोषत नाहीत.

सुक्ष्मदर्शकातून दिसणारी कूर्चा

बाह्य दुवे संपादन