क्ष-किरण
(इंग्लिश भाषा:X-Rays) शास्त्रज्ञ विल्यम रॉंटजेन यांनी शाधलेली किरणे.
क्ष-किरण
संपादनही एक प्रकारची विद्युतचंबकीय विकीरणे असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटरपर्यंत असते व वारंवारिता ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्झाहर्ट्झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी ही गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनील किरणांपेक्षा जास्त असते.
शोध
संपादनविल्यम रॉंटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते. फक्त विल्यम रॉंटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली. विल्यम रॉंटजेनच्या आधी जॉन हित्रॉफ, इव्हान Pulyui, निकोला टेस्ला, फरनॅंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम रॉंटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की, काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे अनुमान निघाले, की काही किरणे दिसत नाहीत, परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात. या किरणांना 'क्ष' किरण असे नाव ठेवले गेले.
उपयोग
संपादनवैद्यकीय
संपादनक्ष-किरण प्रतिमा
संपादनवैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.
सीटी स्कॅन
संपादनसीटी स्कॅनच्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथे नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही,(उदा. मेंदू) तिथे हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा सीटी स्कॅनच्या साहाय्याने मिळू शकते.
ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.
अंतर्तपासणी
संपादनविमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी सामानाच्या अंतर्भागात असलेल्या संभाव्य स्फोटकांच्या तपासणीकरता क्ष-किरणांचा वापर केला जातो.
अंतराळ संशोधन
संपादनचंद्रा दुर्बिणीमध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते.
औद्योगिक
संपादनऔद्योगिक वापर - मुख्यतः धातूंच्या जोडांतील छिद्रे शोधण्याकरिता क्ष-किरणांचा वापर केला जातो.
हानिकारक घटक
संपादनक्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच.
बाह्यदुवे
संपादनक्ष-किरणांचा शोध Archived 2010-09-10 at the Wayback Machine.
क्षकिरणांचा इतिहास Archived 2020-01-22 at the Wayback Machine.