वर्सोवा (मुंबई)

(मढ किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

वेसावे किंवा वर्सोवा हा भारताच्या मुंबई शहराचा एक भाग आहे. उच्चभ्रू वस्तीत गणला जाणारा हा भाग अंधेरी उपनगरात मोडतो.

इतिहास

संपादन

येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. इ.स. १७३९पर्यंत हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्याची नोंद आढळते. १७३९ च्या वसईच्या लढाईदरम्यान मराठ्यांनी हा प्रदेश जिंकला व त्याबरोबरच तेथील किल्लाही. नंतर मुंबईतील इंग्रजांच्या अंमलाखाली आलेला हा प्रदेश १९४७मध्ये भारतात विलीन झाला.

समुद्रकिनारा

संपादन

येथील खाडीसदृश समुद्रकिनाऱ्यावर अनेक लोक भेट देतात. किनाऱ्याची झीज होण्यापासून रक्षण करण्याकरता प्रचंड आकाराचे दगड समुद्रात टाकण्यात आलेले आहेत परंतु भरतीच्या वेळी हा सगळा किनारा पाण्याखाली जातो. वेसावे खाडीला कांदिवलीतून वहात येंणारी पोयसर नदी मिळते. वेसावे हे मासेमारीचे एक बंदर आहे.

किल्ला

संपादन

पोर्तुगीजांनी बांधलेला[] वर्सोवा किल्ला किंवा मढ किल्ला येथून जवळ आहे. मालाड रेल्वेस्थानकापासून १५ कि.मी. अंतरावर अक्सा बीचजवळ असलेला हा किल्ला बेस्टच्या २७१ मार्गाचे शेवटचा थांबा आहे. वर्सोव्याहून फेरी बोटीनेही येथे पोचता येते. येथून मुंबईपासून वसईपर्यंतचा किनारा, समुद्र तसेच मार्वे खाडी टेहळता येते. या किल्ल्याजवळ भारतीय नौदलाचा तळ असून किल्ला भारतीय वायुसेनेच्या ताब्यात आहे. येथे अनेक चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांचे फिल्मीकरण होते.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन