मंथन (चित्रपट)

(मंथन या पानावरून पुनर्निर्देशित)


मंथन ( The churning या अनुवादित शीर्षकाखाली देखील प्रदर्शित झाला होता) हा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला १९७६ चा हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट वर्गीस कुरियन यांच्या दूध सहकारी चळवळीपासून प्रेरित आहे आणि तो आणि विजय तेंडुलकर यांनी संयुक्तपणे लिहिलेला आहे. [१] हे भारताच्या श्वेतक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाने मोठे यश कमावले होतेच, परंतु याने "सामूहिक सामर्थ्या" चे देखील प्रदर्शन केले कारण याची निर्मिती पूर्णपणे सामूहिक निधीवर झाली होती. एकूण ५,००,००० शेतकऱ्यांनी प्रत्येकी ₹२ जमा चित्रपटासाठी जमा केले होते. [२] [३] सामूहिक निधी (क्राउडफंड) द्वारे तयार केलेला मंथन हा पहिला भारतीय चित्रपट आहे. [४]

मंथन (चित्रपट)
संगीत वनराज भाटिया
देश भारत
भाषा [[हिंदी भाषा|हिंदी]]
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



या चित्रपटाला १९७७ चा हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि विजय तेंडुलकर यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. १९७६ च्या च्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठीही भारताकडून हा चित्रपट पाठवला गेला होता. [५]

चित्रपटाचे शीर्षक गीत ("मेरो गाव कथा परे") प्रीती सागरने गायले होते. [६] तिला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला . [७] हे गाणे नंतर अमूलच्या टेलिव्हिजन जाहिरातीसाठी साउंडट्रॅक म्हणून वापरले गेले. [८]

संदर्भ संपादन

  1. ^ "How a farmers' servant painted the nation white" (PDF). UNDP quoting Hindustan Times. 9 September 2012. Archived from the original (PDF) on 5 December 2014. 27 November 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Shyam Benegal at ucla.net South Asia Studies, University of California, Los Angeles(UCLA).
  3. ^ "Milkmen turned producers". The Hindu. 26 July 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Did you know Shyam Benegal's Manthan was India's first crowdfunded film?". Mid-Day. 2019-06-01. 2019-06-16 रोजी पाहिले.
  5. ^ Margaret Herrick Library, Academy of Motion Picture Arts and Sciences
  6. ^ Team, Tellychakkar (15 September 2012). "When Preeti Sagar struck the right notes for Prince Charles". Tellychakkar.com. 2017-07-21 रोजी पाहिले.
  7. ^ Us Salam, Ziya (12 September 2012). "Manthan (1976)". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2017-07-21 रोजी पाहिले.
  8. ^ यूट्यूब वरची The Amul Story Manthan – Mero gaam katha parey