भिकल्या लाडक्या धिंडा
भिकल्या लाडक्या धिंडा हे भारतीय तारपावादक आहेत. हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या वाळवंडे गावचे हे मूळ रहिवासी आहेत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बालपण
संपादनघरातच तारपा वादन वर्षानुवर्षे चालत असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच तारपा वाजविण्याची आवड होती.लहानपणी वयाच्या दहाव्या वर्षापासून ते जंगलात गुरेढोरे चरावयास घेऊन जात असत.त्यावेळी ते आपल्या सोबत तारपा वाद्य घेऊन जात असत. गुरेढोरे चरत असताना ते तारपा वादनाचा सराव करीत.
वादन परंपरा
संपादनत्यांच्या घराण्यात साधारण दीडशे वर्षांपासून तारपावादनाची परंपरा आहे.त्यांचे आजोबा नवसू धाकल्या धिंडा तारपा वादन करीत असत. त्यानंतर त्यांचे वडील लाडक्या धाकल्या धिंडा तारपा वाद्य वाजवित असत.
तारपा वादन
संपादनवयाच्या पंधराव्या वर्षी ते तारपा वादन करायला लागले.
सन्मान
संपादनआतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यापैकी खाली दिलेले महत्त्वाचे पुरस्कार आहेत.
संदर्भ
संपादनमहाराष्ट्र टाईम्स, शनिवार,२१ ऑगस्ट २०२१.