भावना जाट (१ मार्च, १९९६:काब्रा, राजसमंद जिल्हा, राजस्थान, भारत - ) ही एक भारतीय मैदानी खेळाडू आहे. ही २० किमी चालण्याच्या शर्यतीत भाग घेते [१] हिने २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तेथे ती ३२व्या क्रमांकावर आली. [२]

भावना काब्रा
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १ मार्च, १९९६ (1996-03-01) (वय: २८)
जन्मस्थान काब्रा, राजसमंद जिल्हा, राजस्थान, भारत
खेळ
खेळ २० किमी चालणे

जाटचा जन्म हरयाणातील एका शेतकरी कुटुंबात झाला. आपल्या तीन भावंडांपैकी ती सर्वात लहान आहे.

शाळेत असताना शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी तिला एकदा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घेउन गेले होते. त्यावेळी फक्त ३ किमी चालण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी जागा उरली होती. जाटने यात भाग घेउन दुसरा क्रमांक मिळवला.[३]

यानंतर तिने या खेळप्रकारात भाग घेणे सुरू ठेवले. आपल्या गावातील जुनकट विचारांच्या लोकांनी आपल्याला सराव करताना आखूड चड्डीमध्ये पाहू नये म्हणून ती पहाटे सराव करण्यास जात असे. [४] तिचे आई वडील गरीबीत असल्याने भावनाला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. इतकेच नव्हे तर बुटांसाठी पैसे नसल्याने तिला स्पर्धांमधून अनवाणीही भाग घ्यायला लागत असे.[५] [३]

२०१४-१५ दरम्यान जाटने विभागीय आणि राष्ट्रीय कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकली. २०१६मध्ये तिने भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम बंगालमधील हावडा येथे तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी पत्करली. [३]

संदर्भ संपादन

  1. ^ "India's Bhawna Jat makes the Olympic cut in 20km race walk". India Today (इंग्रजी भाषेत). 15 February 2020. 2021-07-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Priyanka Goswami 17th, Bhawna Jat 32nd in women's 20km race walk, Gurpreet fails to finish in men's event". indiatvnews.com. PTI. 6 August 2021. 25 May 2022 रोजी पाहिले.
  3. ^ a b c Selvaraj, Jonathan (16 February 2020). "Bhawana Jat's journey from grazing cattle to the Olympics". ESPN.in. 26 February 2020 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "espn" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  4. ^ Basu, Suromitro (19 February 2020). "From practicing at 3am, Bhawna Jat is now living the race walking dream". Olympic Channel. 26 February 2020 रोजी पाहिले.
  5. ^ Asnani, Rajesh (16 February 2020). "Rajasthan's Bhwana Jat sets new national record in race walking, qualifies for Tokyo Olympics". The New Indian Express. 26 February 2020 रोजी पाहिले.